
मनमाड : शुक्रवार दिनांक २६ नोव्हेबर २०२१ रोजी आॕल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लाॅईज असोशिएशन रेल्वे ट्रॅक्शन कारखाना अतीरीक्त मंडल नासिकरोड तर्फे, एससी/एसटी कार्यालय आंबेडकर भवन येथे, संविधान गौरव दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला.
सर्व प्रथम प्रमुख पाहुणे अॕड महाले साहेब व रेल्वे ट्रॕक्शन कारखान्याचे मुख्य कारखाना प्रबंधक माननीय एस सी चौधरी साहेब,यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करण्यात आले.ए पी ओ माननीय सत्यजीत गोवंदे साहेबांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प वाहण्यात आले. या प्रसंगी कार्यालयात असलेल्या सर्व महापुरूषांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून, मानवंदना देवून संविधानाप्रती इमान राखण्याची शपथ घेण्यात आली.याप्रसंगी प्रमुख मान्यवरांचे संविधानावर समर्पक भाषणे झाली. भाषणात भारतीय राज्यघटनेचे मुलभुत अधिकार कायदे कलम पटवुन देण्यात आले.संविधानाचा गुण गौरव करुन, त्या वेळचा इतिहास कथन करुन, संविधान भारतीय जनतेसाठी सदैव चिरकाल किती गरजेचे व महत्वपुर्ण आहे. हे सोप्या व सरळ भाषेत पटवुन देण्यात आले.या प्रसंगी असोशिएशनचे झोनल उपाध्यक्ष मिलींद देहाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संघटनेच्या अतिरीक्त मंडलच्या अध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे मॅडम यांनी सुत्रसचांलनाची धुरा सांभाळली.घटना तज्ञ अॕड महाले साहेबांनी भारतीय संविधानाची पुर्वीची व आजची परिस्थिती विषद केली. घटनेचे उद्दीष्ट व घटनेने दिलेले मुलभुत अधिकार न्याय , हक्क ,उद्दीष्टे व राज्य घटनेचा संपुर्ण उलगडा करुन, सोप्या व सरळ भाषेत घटनेचे महत्व पटवले.यावेळी सघंटनेचे कार्याध्यक्ष समीर साळवे ,अति -सचिव अविनाश कटारे, खजिनदार दिपाली पांडव ,वरीष्ठ उपाध्यक्ष अनिल जगताप,उपाध्यक्ष दिपक धीवर ,ए पी गायकवाड ,निलेश रोकडे , सचिन सिरसाठ ,जे पी येळवे, अनिल चोपडे, जे एस पवार ,अमोल कलाणे ,दिलीप दुधगम ,किरण गागुंर्डे ,शिवपाल युईके ,महेन्द्र बावीस्कर दिनेश दामोर, एस एस पवार ,आशिष सिरसाठ,योगेश भालेराव ,मिलींद सिरसाले , वाय बी भांगरे ,एम जी भवर ,सरकार साहेब ,डी एस गोविंद , बिश्वास साबळे ,विवेक परदेशी ,व्ही. बी. हेडाउ ,नामदेव सरोदे ,हेमा गजहंस ,व्ही के चौधरी ,प्रमोद महाशब्दे ,सुर्यभान खैरे ,अशोक खरे,डी व्ही सैद ,महाजन ,भरत कदम आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते .
तिन्ही संघटनेचे एन आर एम यु , सी आर एम एस ,एससी/एसटी असोशिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना संविधान गौरव दिना निमित्त काॅफी व मोतीचुर लाडु पेढयांचे वाटप करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करून, संविधान गौरव दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.सर्वांचे आभार सघंटनेचे उपाध्यक्ष हरीषजी जाधव ,व वरीष्ठ उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी मानले.
