बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ आयोजित “प्र.ल.मयेकर स्मृती अभिवाचन स्पर्धा” संपन्न.

0

मुंबई : बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या संगीत व साहित्य विभागाच्या वतीने नाटककार स्वर्गीय प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या ७५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या लेखन साहित्यावर आधारित “स्वर्गीय प्र. ल.मयेकर स्मृती अभिवाचन स्पर्धा” शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी कै.रमेश रणदिवे कलादालन, आणिक आगार येथे फार मोठ्या उत्साहात पार पडली, सदर स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी भाग घेतला होता, या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ख्यातनाम अभिनेते श्री.संजय मोने आणि श्री.अनिल गवस यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेला बेस्ट समिती सदस्य मान.श्री.अनिल कोकीळ साहेब आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.तसेच सभापती (कला) डॉ.राजेंद्र पाटसुते, सभापती (क्रीडा) श्री.धनंजय पवार, श्री.प्रकाश मयेकर, सौ.विशाखा सहस्त्रबुद्धे, श्री.निखिल मयेकर, श्री.विजय बोरकर, कु.निकेता बोरकर या मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक: प्रमोद सुर्वे, द्वितीय क्रमांक: वीणा जवकर, तृतीय क्रमांक: धनंजय पवार, उत्तेजनार्थ १: संविध नांदलस्कर, उत्तेजनार्थ २: संदेश नाईक, प्रशस्तीपत्रकं: प्रभाकर धांगडे, गणेश मिंडे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.! ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मानद सचिव शेखर कवळे, सरचिटणीस (कला) विजय सूर्यवंशी तसेच उदय हाटले, अभय चव्हाण, भूषण मेहेर, संदीप खराडे, चारुदत्त वैद्य, यतीन पिंपळे, पांडुरंग दाभोळकर, सुरेश अढळराव, विवेक पितांबरे, दिलीप लिगम, योगेश पाटील, गणेश जांभे, वसंत राणे, दीपक कारेमोरे, सुदर्शन पाटील, वीरेंद्र बेंद्रे व अनिल चौगुले यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here