जि. प. सदस्या डॉ.नूतन आहेर यांच्या हस्ते माळवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

0

नाशिक ( देवळा -प्रशांत गिरासे ) वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ.नूतन सुनील आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून व पालक मंत्री मा.ना.छगनरावजी भुजबळ यांच्या सहकार्याने माळवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर (गोटू आबा) हे उपस्थित होते. माळवाडी ते आखर रस्ता सुधारणा करणे, जनसुविधा योजनेअंतर्गत नवीन स्मशानभूमी दहन शेड बांधणे, पाईप लाईन द्वारे माळवाडी गाव तळे व खाटकी नाला येथे पाणी टाकने या कामांचे भूमिपूजन व अपारंपारिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत सौर पथदीप बसविणे याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच शिवाजी बागुल उपसरपंच निकेश जाधव, सतीश बागुल, बापू बागुल, सुशांत गुंजाळ, खुशाल बागुल, गोकुळ बागुल, ताराचंद बागुल, महेंद्र सोनवणे, संजय सोनवणे, तुळशीराम बच्छाव, दिलीप शेवाळे, संदीप शेवाळे, प्रदीप शेवाळे, गणेश बागुल, किशोर बागुल, प्रवीण बागुल, ग्राम विकास अधिकारी संभाजी देवरे आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here