सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाची सन २०२२~२४ साठीची निवडणूक बिनविरोध

0

नाशिक ( प्रशांत गिरासे नाशिक) नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित सुरगाणा तालुकाध्यक्ष मराठी पत्रकार संघाची सन २०२२~२४ द्विवार्षिक निवडणूक नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांचे मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली.सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांचे प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह सुरगाणा येथे पार पडली.जिल्हा पदाधिकारी शाम खैरनार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.नविन कार्यकारिणी.तालुकाध्यक्ष रतन चौधरी,कार्याध्यक्ष हिरामण चौधरी,उपाध्यक्ष लक्ष्मण बागुल व लक्ष्मण पवार,सरचिटणीस आनंद पडवळ,सहचिटणीस रमेश आहेर,खजिनदार शाम खैरनार,सहखजिनदार भास्कर भोये,संघटक अशोक गवळी,सहसंघटक एकनाथ बिरारी,समन्वयक अल्केश सुराणा, कार्यकारिणी सदस्य शुभम आहेर, वाल्मिक साळुंके,संतोष कस्तुरे व नसिर मणियार.
नवनिर्वाचित पदाधिकारींचा संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here