कृषी कायदे रद्द केल्याचं किसान युवा क्रांतीकडून जल्लोषात स्वागत

0

नाशिक ( प्रशांत गिरासे वासोळ,मो.9130040024 ) “केंद्र सरकारने लादलेले कृषी कायदयांना शेतकऱ्यांचा विरोध होता आणि रद्द केल्याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही केंद्र सरकारचे आभार मानतो आणि या आंदोलनात बलिदान केलेल्या शेतकऱ्यांच्या स्मृतींना वंदन करतो” असे प्रतिपादन किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी केले.आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली आणि त्यानंतर किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने माळवाडी येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला, त्यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.’इथून पुढच्या काळात सुद्धा शेतकरी चळवळ अशीच मजबूत केली जाईल’ असा विश्वास त्यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला त्यावेळी सुरज अहिरे, संजय जगदाळे अनिल भामरे, चेतन गिरी, प्रकाश भदाने, देवेंद्र बच्छाव, खुषाल पवार,ऋषिकेश खैरणार,मोहित वाघ,प्रवीण गांगुर्डे,संजय खैरे,भूषण बागुल,डॉ.अंकुश जगदाळे, किरण मारवाळ,ओमकार बागुल,हेमंत बागुल बागुल,आदित्य सोनवणे,संजय सोनवणे अनिल गोसावी, तात्याभाऊ भदाने, शशिकांत शेवाळे, शैलेश गोसावी, वैभव बागुल, रोहित शेवाळे,राहुल अहिरे, शुभम बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने किसान युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here