पाच वर्षाचा मालमत्ता कर वसूल करायचाच आहे, हेच पुन्हा एकदा सिद्ध

0

मुंबई : मागील सलग 7 महिन्याच्या 7 ऑनलाइन महासभा झाल्या. त्यामध्ये सत्ताधारी, स्वतःहून जनतेसाठी ज्वलंत असणारा आणि जनतेच्या खिशातून अन्यायकारक वसुली करणारा मालमत्ता कराचा विषय चर्चेला घेत नव्हते. ऑनलाइन सभा असताना, माझा माइक वारंवार MUTE करण्यात येत होता.आज प्रथमच ऑफलाइन महासभा फडके नाट्यगृहात घेण्यात आलेली होती. सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या अभद्र युतीने, मालमत्ता कराचा विषय कधीही चर्चेला आणला नाही, म्हणून मी सभाग्रहात मालमत्ता करा विषयी आवाज उठविला असता, महापौरांनी सभा तहकूब केल्याने, सत्ताधाऱ्यांना बेकायदेशीरपणे, दुहेरी, अवाजवी आणि मागील पाच वर्षाचा मालमत्ता कर वसूल करायचाच आहे, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले.( सौ लीना अर्जुन गरड, नगरसेविका पनवेल महानगरपालिका,
अध्यक्ष कॉलनी फोरम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here