पालघर दि. 17 :-मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे कमी झाले आहे. परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक असणाऱ्या सुविधा शासन पुरविणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी व्यक्त केला.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला 13 चारचाकी पोलीस वाहन पालकमंत्री दादाजी भूसे यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना आचोळे पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हस्तांतरण केले. त्यावेळी पालकमंत्री दादाजी भूसे बोलत होते.ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून नविन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले होते. पोलीस आयुक्तालय नविन असल्याने पोलीस विभागाला पोलीस स्टेशन उभारण्यासाठी, निवास्थानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.जिल्हा नियोजन समिती मार्फत पोलीस दलाला गस्त घालण्यासाठी 72 दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत . पोलीस दलातील शिपाई पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांन प्रयन्त सर्वांच्या निवास्थानाचा प्रश्न सोडविण्यात येणार तसेच महिला पोलीस यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.आव्हानात्मक परिक्षेत्रामध्ये गुन्ह्यांची उकल 75 टक्के पर्यत पोहचली असून येत्या काळात पोलीस आयुक्त श्री.दाते हे प्रमाण 100 टक्क्यापर्यन्त नेतील असा विश्वासही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब हे पालघर जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री श्री.ठाकरे साहेब हे वेळोवेळी, जिल्ह्याच्या समस्यांवर, रोजगार निर्मिती तसेच विकास कामे या सर्वांचा आढावा घेत असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी मुख्यमंत्री श्री.ठाकरे साहेब निधी कमी पडू देणार नाहीत असा विश्वासही पालकमंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केला.पालकमंत्री यांनी पेल्हार पोलीस चौकीस भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या मोरेगाव येथील नवीन पाण्याच्या टाकीची पाहणी तसेच त्या लगतच्या परिसरातील चार एकर शासकीय जागा विकसीत करण्यासाठी जागेची पाहणी पालकमंत्री श्री.भुसे यांनी केली.वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाचा आढावा पालकमंत्री श्री.भुसे यांनी घेतला. नागरीकांना पायाभूत सुविधा महापालिकेने उपलब्ध करून द्याव्यात अश्या सूचना महापालिका आयुक्त गंगाथरन.डी यांना केल्या.