घरगुती सिलेंडर टाकीची गळती

0

नाशिक : नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र ९ मधील शिवाजीनगर येथे नाशिक महानगरपालिका शाळा क्र २० व २१ लगत घरगुती सिलेंडर टाकीची गळती होऊन मोठी घटना घडली.यामध्ये कोठावदे परिवार व पाटील परिवार यांचे मोठे नुकसान झाले. भारतीय जनता युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांनी तत्काळ १४/११/२१ रात्री ११ वाजता जागेवर पोहचुन फायरब्रिगेड डिपार्टमेंट ला कळवून ,लगेच फायर बंब बोलुन घेतला,तसेच MSEB कनिष्ठ अभियंता यांना जागेवर बोलुन परिस्थिती आटोक्यात आणली, कोठावदे व पाटील दोघे परिवाराला तत्काळ हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले..त्याप्रसंगी नाशिक महानगरपालिका माजी सभागृहनेते तथा नगरसेवक दिनकर पाटिल यांनी देखील ठाणे वरुण थेट घटनास्थळी धाव घेतली.तसेच शिंदोरी रोडला १३/११/२१ रोजी बिबट्याने थानिक रहिवासी दामु पाटील यांच्या गायीचे वासरू फस्त केले ,त्यानंतर पुन्हा १४/११/२१ रोजी संत तुकाराम महाराज क्रीडांगण पाठीमागे शिंदोरी रस्त्याच्या लगत शेतकरी सोमनाथ पाटील यांच्या कुत्र्यावर सुद्धा हल्ला करुण जखमी केले सदर ठिकानी अमोल दिनकर पाटील यांनी RFO भदाने साहेब यांच्या सोबत फोनद्वारे त्यांना कल्पना देवुण रात्री १२:१५ am वाजता फॉरेस्ट स्क्वॉड सोबत घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण माहीती घेतल्यावर रात्री नाशिक महानगरपालिका पशुवैद्यकारी डॉक्टर सोनवने साहेबांना फोनद्वारे माहीती देवुण त्यांनी आपली टीम पाठवुन रात्री १ वाजता श्वानाचे उपचार केले व आज रोजी सदर परिसरामध्ये बिबट्या पकडण्याकरीता पिंजरा दुपार पर्यंत लावण्यात येणार आहे अशी माहीती अमोल दिनकर पाटील यांनी फोरेस्ट डिपार्टमेंट यांच्या वतीने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here