अखिल वैश्य वाणी समाज महासंघाचा कौटुंबिक मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न.

0

( प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांस कडून ) मुंबई-प्रतिक्षा नगर-सायन,अखिल वैश्य वाणी समाज महासंघाच्या विद्यमाने समाजबांधवांचा कौटुंबिक मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा आणि मान्यवरांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लकेश्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जेतवन सामाजिक प्रतिष्ठान सभागृह, प्रतिक्षा नगर, सायन येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. समाजातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक यशवंत जैतपाल, अनंत गांधी, रघुनाथ शेरे, सौ. मानिनी शेरे आणि शंकर टक्के यांनी दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. संस्थेचे सरचिटणीस विनायक हेगिश्टे यानी प्रास्ताविकपर भाषण करून आतापर्यंत संस्थेच्या झालेल्या कार्याचा आढावा घेऊन पुढील आयोजीत कार्यक्रमाची माहिती सादर केली. याप्रसंगी ज्येष्ठ महिला व बांधव तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्याँचा गुणगौरव, ओबीसी दाखला , समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजरत्न, समाज भूषण , विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती , महिलांना बचतगत योजना , वधूवर मेळावे, बेरोजगाराना नोकऱ्या , आरोग्य शिबिरे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात सर्वश्री संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर शेट्ये , उपाध्यक्ष गुरुनाथ बेर्डे , खजिनदार सुभाष साडविलकर , कृष्णा गंधे, दत्तात्रय वंजारे , अनिल जठार , ज्येष्ठ नागरिक अनिल गांधी , यशवंत जैतपाल , रघुनाथ शेरे , वसंत हरियाण , टक्के सर तर महिला आघाडीच्या वतीने पल्लवी ताठरे , नम्रता लाड , कल्पना तोडकरी , कु करिष्मा पाथरे इत्यादीनी सहभाग घेऊन मौलिक सूचना केल्या याप्रसंगी गेली २० वर्षे पत्रकारीता क्षेत्रांत योगदान देणारे पत्रकार आणि चित्रपट दिग्दर्शक महेश्वर तेटांबे आणि साप्ताहिक राजगड चे संपादक शंकर पागिरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाच्या शेवटी चिटणीस लहू नर यानी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली,धन्यवाद ,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here