रोहिले बु ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांचा मनमानी कारभार

0

नांदगाव( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेले रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच ठकूबाई देविदास पवार ग्रामसेवक भगवान जाधव हे मनमानी कारभार करत असून येथील बौद्ध समाज यांच्यावर अन्याय करत असून बौद्ध समाजाच्या घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करता येथील जातीयवाद कसा निर्माण होईल याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप येथील सविधान आर्मी चे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी बोलताना सांगितले. रोहिले बुद्रुक येथील सन 2012 मध्ये येथील गावासाठी शासनाने दिलेल्या सार्वजनिक सुविदेमधील मधील भूखंड क्रमांक एक व भूखंड क्रमांक दोन हे दोन भूखंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि भूखंड क्रमांक तीन हे देण्यात यावा असा ठराव या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आलेला असतानाही व डॉक्टर बाबासाहेब पुतळा साठी वॉल कंपाऊंड करण्यात आलेले आहे. परंतु या ग्रामपंचायतीने डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा चा 8अ चा उतारा क्षेत्रफळानुसार बनविलेला नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाजातील लोकांनी दहा ते बारा वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार तेराशे ते चौदाशे चौरस मीटर जागा क्षेत्रफळाचा 8अ चा उतारा बनविण्यात यावा आणि बुद्ध विहारासाठी ग्रामसभेत नियोजित केलेल्या जागेचा आठशे ते हजार चौरस मीटर जागेचा 8अ चा उतारा तयार करून नियोजित असलेल्या बुध्द विहाराच्या जागेवरील व जागे समोरील अतिक्रमण काढणे संदर्भात दहा ते बारा वर्षापासून या ग्रामपंचायतीला अर्ज देऊन देखील व मासिक सभा आणि ग्रामसभा मध्ये बहुमताने ठराव मंजूर करून देखील ही ग्रामपंचायत अतिक्रमण काढण्यास तयार नसून व वरिष्ठ कार्यालयाकडे ही पत्रव्यवहार करत नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य आणि बौद्ध समाजातील ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.
ग्रामसेवक भगवान जाधव यांना विचारले असता त्यांनी बोलताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व बुद्धविहाराचे नियोजित जागा मोजणी झाल्याशिवाय व शासनाची परवानगी असल्याशिवाय आम्हाला आटा चे उतारे आणि येथील अतिक्रमणे करता येत नसल्याचे सांगितले.सन 2012 मध्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि बुद्ध विहारासाठी नियोजित दिलेली जागा सन 2017 – 2018 मध्ये त्यावेळी चे सरपंच रमाबाई कंसात नरवडे व ग्रामसेवक एन एस तडवी यांना बुद्ध विहारासाठी नियोजित दिलेली जागा येथील ग्रामपंचायतीचे बाबासाहेब तुकाराम अर्बुज आणि सुनील तुकाराम अरबूज यांना व्यवसायासाठी देऊन 11 नंबर रजिस्टरमध्ये नोंद कशाच्या आधारे आणि कोणत्या कायद्याच्या आधारे त्यावेळच्या ग्रामपंचायतीने दिले आणि सध्याचे असलेले ग्रामसेवक भगवान जाधव यांनाच या बुद्ध विहार वरील जागेवरील हो जागे समोरील दुकाने अतिक्रमणे काढणीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव आणि मोजणी करून मिळणे कामी ठराव करून त्याची प्रशासकीय मान्यता आत्तापर्यंत काही नाही त्यांनाच फायदा आहे की काय आणि 2017 – 2018 मधील ग्रामपंचायतीचे सरपंच रमाबाई नरवडे व ग्रामसेवक एन एस तडवी यांना कुठलाही कायदा व नियम नव्हते का तसेच त्यावेळच्या ग्रामपंचायतीला कायदा वेगळा होता आणि आता या ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवक भगवान जाधव त्यांच्यासाठी शासनाने कायदा वेगळा केला की काय असा प्रश्न पडत आहे.
येथील बुद्धविहाराचे नियोजित असलेली जागा व्यवसायासाठी देण्यात आली त्यावेळच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील सविधान आर्मी चे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बौद्ध ग्रामस्थ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here