सुभाष नगर येथे पानंद रस्ता कामाचा लोकसहभागातून जि. प. सदस्या डॉ.सौ.नूतन आहेर यांच्या हस्ते शुभारंभ

0

नाशिक ( प्रशांत गिरासे वासोळ) देवळा-(दि.१४ नोव्हेंबर) शेत शिवारात जाण्यासाठी रस्त्यांची समस्या हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर यांनी जातीने लक्ष घातले शेतकऱ्यांना एकत्र घेऊन शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतः जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन पानंद रस्ता दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सुभाष नगर येथील करला नाल्याजवळील आई मोमाई पानंद रस्ता अत्यंत खराब असल्याने व पावसाळ्यात पाणी असल्यावर ट्रॅक्टर व इतर चार चाकी वाहने घेऊन जाता येत नसल्याने भाव असून देखील शेतमाल मार्केटला नेणे शक्य होत नव्हते व कुटुंबातील कोणी सदस्य आजारी पडल्यास दवाखान्यात नेण्यासाठी अतोनात हाल होत. ही बाब येथील शेतकरी दशरथ पुरकर यांनी सुनील आहेर यांच्या लक्षात आणून दिली असता स्थानिक शेतकरी बांधवांची दि.११ नोव्हेंबर रोजी त्यांनी बैठक घेऊन समन्वयाने मार्ग काढला लोक सहभाग व स्वतः जेसीबी मशीन देऊन दि.१३ नोव्हेंबर रोजी सदर रस्ता कामाचा शुभारंभ जि. प. सदस्या डॉ.नूतनताई आहेर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, दशरथ पुरकर, मा.पो.पा. माधव पगार, निंबा जाधव, भगवंत गुंजाळ, बापू निकम, पोपट मेधने, हिरामण शिंदे, सतीश जाधव, शरद निकम, भागाजी गुंजाळ, कारभारी पगार, जयवंत जाधव, सुरेश खैरे, सुधाकर खैर, भगवान पगार, बाबाजी वाघ, सुखदेव पगार, आबा शिंदे, मंगेश जाधव, शशिकांत पगार, नितीन पगार तसेच महिला शेतकरी निर्मला खैर, लताबाई जाधव, मिराबाई गुंजाळ, मंजुळा जाधव, सुनिता जाधव, शालिनी शिंदे, कल्पना शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here