क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून भाऊबीजेनिमित्त साडी भेट

0

मुंबई -( जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७) कोरोनाच्या संकटाचा ज्या ज्या घटकांना फटका बसला अश्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायात पुन्हा उभे राहण्यास मदत करण्याचे धोरण मी व भाजप च्या सर्वच कार्यकर्त्यांनी अवलंबिले असून त्याच धर्तीवर लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. भाऊबीजेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे लावणी कलावंत भगिनींना साडी भेट देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,फाउंडेशन च्या विश्वस्त शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शो संयोजक सत्यजित धांडेकर, नगरसेविका हर्षाली माथवड,वासंतीताई जाधव, वृषलीताई चौधरी, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस दिनेश माथवड,नवनाथ जाधव, दीपक पवार, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यन्त मोहोळ इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की “कोरोना काळात रोजगार बुडाल्याने पुन्हा उभे राहताना जे भांडवल लागते ते पुरविण्याचा आम्ही निर्णय केला आणि त्यासाठी रिक्षा चालक यांना सी एन जी कुपन, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम, बचत गटाने तयार केलेल्या वस्तू विकत घेण्याचा उपक्रम, महिलांना शिलाई मशीन भेट देऊन त्यांना कपडे शिवण्याचे काम देखील दिले असे सांगतानाच, त्याच धर्तीवर लावणी कलावंतांना त्यांचा शो सुरु करण्यासाठी सर्वतोपरी मदत करताना एका शो ची सर्व तिकिटे आम्ही खरेदी करू व मानधन देखील देऊ,त्या माध्यमातून त्यांचे पुढील शो साठी चे भांडवल उभे राहिल असे वचन ही चंद्रकांतदादा यांनी दिले. पुरुष असून ही स्त्री वेषातली लावणी सादर करणारे फिरोज मुजावर यांना विशेष सन्मानित करण्यात आले. माझ्या फाउंडेशन च्या वतीने नवरात्र, गणेशोत्सव, शिवजयंती सोहोळा साजरा केला जातो, त्यात दरवर्षी दर्जेदार लावणीचे कार्यक्रम केले जातात, मात्र गत दोन वर्षात हे कार्यक्रम झाले नाहीत म्हणून लावणी कलावंतांना भाऊबीज निमित्त भेट देण्याचा उपक्रम राबविल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी लावणी कलावंत तेजस्विनी लोकरे,स्वाती धोकटे, शीतल चोपडे, शबनम महिमकर, पूजा नाईक, शिल्पा भवार, निकिता शाह, उषा करंबळेकर, सीमा पटेल, दीपा मातवड,रुपाली लोंढे, माधवी गवंडे इ भगिनींना साडी भेट देण्यात आली. मला भाऊ नाहीये त्यामुळे आज आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि संदीपभाऊ खर्डेकर यांनी जी भाऊबीज भेट दिली ती कायम स्मरणात राहील असे नृत्यांगना तेजस्विनी लोकरे म्हणाल्या. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व सत्यजित धांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन व प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here