आमदार सुहास आण्णा कांदे यांची व्यापारीबांधव तसेच मनमाडकराना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्यापारी पेठेतून पायी फेरी

0

मनमाड : करोनाच्या बिकट परिस्थिती नंतर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना दिवाळी सणानिमित्त व्यापारी पेठेतही वर्दळ वाढत आहे. दिवाळी सणानिमित्त सर्वाच्या भेटीसाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी संपूर्ण शहरात सर्वांच्या भेटी घेत सर्व व्यापारी तसेच जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यापारी बांधवानी त्यांच्या या भेटीप्रसंगी त्यांचे स्वागत करीत आनंद व्यक्त केला.
मनमाडच्या अग्रगण्य प्रगती अर्बन बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मा.कल्याणशेठ ललवाणी यांचा तसेच संघपती रिकबसेठ ललवाणी यांचा आमदारांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.त्यांच्यासोबत शिवसेना जि. उपप्रमुख संतोष भाऊ बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, जि. संघटक राजाभाऊ भाबड, जि. समन्वयक भाऊ पाटील,ता. उपप्रमुख दिनेश केकान, युवा सेनेचे मुन्नाभाऊ, दरगुडे, योगेश इमले, गुलाबभाऊ भाबड, सचिन दरगुडे, सोनू पोहाल, कृष्णा जगताप पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here