आमदार श्री सुहासजी कांदे यांची प्रा.नितीन लालसरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

0

मनमाड : नांदगाव तालुक्याचे आमदार श्री सुहासजी कांदे यांनी दिवाळी निमित्ताने राज्याचे नगरविकास मंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रा. श्री नितिनजी लालसरे यांच्या मनमाड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.मनमाड शहराचे भुमीपुत्र असणारे प्रा.श्री नितिन लालसरे हे नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे लोकप्रिय अधिकारी असुन हे नेहेमी लोकांच्या मदती साठी कार्यरत असतात. या मुळे त्यांना मानणारा सम्पूर्ण राज्यभर खुप मोठा वर्ग असल्याने अत्यंत कमी कालावधी मध्ये प्रा. लालसरे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या मनामध्ये आदराचे स्थान मिळवले आहे.दिवाळी निमित्ताने नांदगाव तालुक्याचे आमदार श्री सुहासजी कांदे यांनी प्रा.श्री नितिन लालसरे यांची भेट घेऊन त्यांना दिवाळी निमित्ताने शुभेच्छा दिल्या , या वेळी प्रा.लालसरे आणि त्यांचा संपुर्ण कुटुंबाच्या वतीने आमदार श्री सुहासजी कांदे यांचे स्वागत करण्यात आले.नांदगाव तालुक्यातील विकास कामांसाठी आमदार श्री सुहासजी कांदे हे नेहमी तत्पर असून प्रा.लालसरे हे देखील आपल्या पदाच्या माध्यमातून नांदगाव तालुका आणि मनमाड शहरातील विकास कामांसाठी नेहेमीच प्रयत्न करत असतात.यावेळी मनमाड शहर शिवसेना प्रमुख श्री मयुर बोरसे , नगरसेवक श्री गंगादादा त्रिभुवन , युवा सत्ता मंचचे सदस्य , श्री जितु धिंगाण मित्र मंडळाचे सदस्य , श्री नितीन लालसरे मित्र मंडळाचे सदस्य आणि मनमाड शहर शिवसेनेचे पदाधिकारी आणि लालसरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here