संविधान आर्मी नामफलकावरील डिजिटल बोर्ड फाडुन विटंबना

0

नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल ÷ नांदगाव तालुक्यातील रोहिले बु येथील येथील बाबासाहेब पुतळे चे जवळ असलेल्या लोखंडी पाटीवरील डिजिटल संविधान आर्मी शाखेचा बोर्ड गावातील समाज कंटक यांनी फाडला असुन एक प्रकारची संविधानाची विटंबना केलीआसल्य ची घटना दिनांक 4 नोव्हेंबर 2021रोजी गुरुवारी घडली आसुन 5 नोव्हेंबर 2021रोजी शुक्रवारी नांदगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. मौजे रोहिले बु पो बोलठाण ता.नांदगाव जि नाशिक येथे संविधान आर्मी शाखेचे नामफलकाचे उदघाटन संविधान आर्मी चे संस्थापक अध्यक्ष जगण भाई सोनवणे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले होते. येथे एक ते दोन महीने होते ना होते तोच दिनांक 4 नोव्हेंबर 2021रोजी गुरुवारी गावतील समाज कंटकानी रात्री अंधाराचा फायदा घेऊन संविधान आर्मी चे लोखंडी पाटीवरील डिजिटल बोर्ड फाडला आहे. याचाच अर्थ असा होतो की संविधानाची अपमान (विटंबना) झाले सारखे होते. गावातील समाज कंटकाना अटक करण्यात येवुन कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी नांदगाव पोलिस स्टेशन मध्ये गेले असता नांदगाव पोलिस यांनी निवेदन स्विकारले नाही. तक्रार दाखल करुन घेतली असुन दिनांक 5नोव्हेंबर 2021रोजी शुक्रवारी सायंकाळी उशिरा 5 ते 6वाजेचे सुमारास भा.द.वि.कलम
427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नांदगाव पोलिस स्टेशन मध्ये रजिस्टर नंबर 1067 असा आहे. व पुढील तपास बोलठाण पोलिस औट पोस्ट चे गागुरडे दादा करत आहेत आशी माहिती नांदगाव पोलिस स्टेशन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here