नाशिक : विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची बैठक दि.०७-११-२१ रोजी शे.का.प.कार्यालय, त्र्यंबक नाका, नाशिक येथे संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
पंजाब साहित्य अकादमी चे प्रमुख व पंजाबी साहित्यिक,समिक्षक, प्रगतशील लेखक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग सिरसा(चंदीगड) यांनी संविधान सन्मार्थ १५वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले आहे अशी माहिती निमंत्रक समितीच्या वतीने या वेळी देण्यात आली.संविधान सन्मार्थ १५वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्री संदर्भात ग्रंथ नगरी समिती स्थापन करण्यात आली व्ही.टी.जाधवसर हे समितिचे निमंत्रक असून.या समितीमध्ये शिवदास म्हसदे,अरुण शेजवळ, यशवंत बागुल आदीचा समावेश आहे.यावेळी स्वागत अध्यक्ष शशीभाई उन्हवणे, मुख्य निमंत्रक डॉ.इंदिराताई आठवले,चंद्रकांत भालेराव,किशोर ढमाले,राकेश वानखेडे,साराभाई वेळूंजकर, अर्जुन बागुल,डॉ.भारत कारिया, यशवंत बागुल,किसन खिल्लारे, उपस्थित होते.