यंदाची दिवाळी लेखकाच्या घरी

0

कु. ईकरा अन्सार पटेल ( इ.६ वी ) कन्या विद्यामंदिर शाळा क्र. १ कुरुंदवाड आणि कु. प्रिन्स सुनिल पाटील ( इ. ४ थी ) जयप्रभा स्कूल जयसिंगपूर या विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी लेखकाच्या घरी साजरी केली.इ.५ वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील ‘कठीण समय येता ‘ या पाठाचे लेखक मनोहर भोसले यांच्या सैनिक टाकळी येथील निवासस्थानी आपल्या पालकांसह पोहचलेल्या या विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारल्या. त्यांनी लेखकाचे स्वतःचे ग्रंथालय पाहिले. नवनवीन कथा, कवितांच्या ऑडिओ ऐकल्या. ‘हराकी ‘ या कादंबरीवर पालकांनी प्रदीर्घ चर्चा केली.यावेळी लेखक मनोहर भोसले यांनी सैनिक टाकळी मधील काही माजी सैनिकांचीही ओळख मुलांना करून दिली. युद्धात मिळालेली पदके,प्रमाणपत्रके तसेच लढाई मध्ये वापरली जाणारी लाठीकाठी, दांडपट्टा, ढाल,तलवार, बंदूक अशी हत्यारे दाखवली.कु.ईकरा पटेल आणि कु. प्रिन्स पाटील यांनी लेखकाच्या मातोश्रीसाठी साडी चोळी भेट दिली. वाढती महागाई, अतिवृष्टी, महापूर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा पालकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या दिवाळीत भरमसाठ आतषबाजी, रोशनाई व अनावश्यक खरेदी टाळावी असे आवाहान लेखक मनोहर भोसले यांनी विद्यार्थ्यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here