मुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल वंजारे यांची नियुक्ती

0

मुंबई : शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेना हिंदू हृदयसम्राट,सरसेनापती मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे, व युवा सेना अध्यक्ष,पर्यावरण मंत्री मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव, खासदार मा.श्री.विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक श्री.सुरेश तुकाराम पाटील यांच्या सल्ल्यानुसार आज शिवसेना भवन दादर येथे मुंबई जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या त्यात मुंबई जिल्हा सरचिटणीस पदी अमोल ज्ञानदेव वंजारे,मुंबई जिल्हा मीडिया प्रमुख पदी मयुरेश सूर्यकांत मोहिरे यांना पदे देण्यात आली त्याप्रसंगी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीप भोज, सचिव श्री.अवि राऊत, सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, तेव्हा शिव सामर्थ्य सेनेचे मुंबई अध्यक्ष श्री.सिद्धेश सूर्यकांत मोहिरे,UHRC चे मुंबई सचिव श्री.सचिन जोइजोडे,श्री.सूर्यकांत शांताराम मोहिरे, सौ.सुजाता सूर्यकांत मोहिरे,सौ.प्रिया सिद्धेश मोहिरे,अक्षय दिलीप आडाव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here