
मुंबई : बदलापूर-प्रतिनिधी – बदलापुर-समाजाचे आपण काही देण लागतो या उद्दात्त हेतुने स्थापन केलेल्या जनजागृती सेवा समितीचा प्रथम वर्धापनदिन व समाजरत्न पुरस्कार सोहळा येथील अजय राजा हाॅल येथे उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग श्री ग्रुप संस्था पुणे चे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज,मुंबई महानगरपालिकाच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनिल गोडसे,जाणीव वृध्दाश्रम व जाणीव अन्नछत्राचे संस्थापक मनोज पांचाळ,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड,सिनियर सेल्स मॅनेजर स्टार हेल्थ इन्शुरन्सचे राजेश विनायक कदम,कीर्तनकार,प्रवचनकार,आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक श्रीराम पुरोहीत हे उपस्थित होते, यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.सर्व प्रमुख पाहुण्यांचे कार्यकारिणीतील पदाधिका-यांनी शाल,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व आगामी येणा-या नविन वर्षात जनजागृती सेवा समिती अंतर्गत व्यावसायिकांना त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी,त्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी,व्यवसायाची विचारांची देवाणघेवाण होईल यासाठी “जनजागृती उद्योग क्रांतीची “घोषणा करण्यात आली.समितीच्या सविव सौ.संचिता भंडारी यांनी वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला.त्यानंतर फक्त बदलापुर येथील विविध क्षेत्रात कार्य करणा-या संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक, संचालक,सचिव,समाजसेवक, पदाधिकारी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते “समाजरत्न पुरस्काराने”गौरविण्यात आले.समाजरत्न पुरस्कार्तींच्या वतीने समता साहित्य अकादमी महाराष्ट्रचे अध्यक्ष दिलीप नारकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता कडुलकर,तेजल तिरपणकर-उकार्डे,प्रदीप जोशी,गणेश हिरवे,श्रुती उरणकर,मिनल गावडे, भावना परब,महेश्वर तेटांबे,आत्माराम नाटेकर,प्रफुल्ल थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप जामसांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांनी केले. सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
