सुभाष नगर येथे जि. प. सदस्या डॉ.नूतन आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

0

वासोळ-  प्रतिनिधी प्रशांत गिरासे: वाखारी जिल्हा परिषद गटातील मौजे सुभाष नगर येथे जि प सदस्या डॉ.नूतन आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून तीर्थ क्षेत्र विकास योजनेअंतर्गत येथील दत्त मंदिर रस्ता काँक्रिटीकरण याचा शुभारंभ तसेच ग्रामपंचायती अंतर्गत सुभाष नगर फाटा ते गावापर्यंत रस्ता दुरुस्ती व गाव स्वच्छता या कामांचा शुभारंभ व भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील गोटू आबा आहेर हे उपस्थित होते जि.प. सदस्या डॉक्टर नूतन आहेर यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध विकास कामे गावाला दिल्याबद्दल त्यांचा यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे माजी सदस्य एकनाथ बाबा आहेर, महेंद्र पुरकर, दशरथ पुरकर, उद्धव आहेर, बाळासाहेब मगर, गंगाधर पुरकर, तानाजी पुरकर, सुरेश पुरकर, दिगंबर पुरकर, गणेश पुरकर, सचिन पुरकर, कल्पेश बोरसे, ग्राम विकास अधिकारी जयश्री निकम आदी उपस्थित होते प्रास्ताविक व आभार दशरथ पुरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here