महाराष्ट्रातील ड्रायव्हर बांधवाचे सरकार निषेधार्थ मुंडन आंदोलन

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: मो.9130040024 क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना व महाराष्ट्र खाजगी वाहनचालक बहुउद्देशिय महासंघ महाराष्ट्र राज्य श्री. आण्णासाहेब जावळे व हजारो ड्रायव्हर बांधवाचे २६ जानेवारी २०२२ रोजी मंत्रालयासमोर करणार मुंडन आंदोलन वाहतूक चालक , मालक यांच्यावरील नेहमी होणारे अन्याय यासाठी श्री.आण्णासाहेब जावळे यांनी गेली १९ते २० वर्षापासून लढा सुरू केलेला आहेत व देशाचे पंतप्रधान , परिवहनमंत्री , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , आणि अनेक सर्वपक्षीय राज्यकिय मंत्री यांना ड्रायव्हर , मालक लोकांच्या व्यथा पत्राद्वारे किती तरी वेळा कळविल्या असून आजपर्यंत सरकारने यावर ठोस असा निर्णय दिला नसून त्यासाठी झोपलेल्या सरकारला जाग करून आमच्या मागण्या मान्य करू घ्यायच्या आहेत . अजूनही वेळ गेलेली नाहीत , मी गेल्या दोन महिन्यापासून सरकारच्या नावाने सुतक पाळलं आहेत. व जोपर्यंत ड्रायव्हर बांधवास न्याय मिळत नाही तोपर्यत मी शांत बसणार नाही. त्यासाठी मला काही त्रास झाला तरी सहन करणार व ड्रायव्हर क्रांती सुरू ठेवणार , ही क्रांतीची मशाल भारतभर पोहचवली म्हणून ड्रायव्हरसाठी पहिलं आंदोलन करणार. दाढी डोक्यावर जटा वाढवणार आहे आणि ते सुतकं मुंडन आंदोलनाने काढू , आता तरी असंघटित कामगार ड्रायव्हर यांच्याकडे लक्ष द्यावे अन्यथा २६ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील हजारो ड्रायव्हर बांधव मंत्रालयासमोर मुंडन करतील . असे श्री. आण्णासाहेब यांनी सरकारला इशारा दिला आहे. आमच्या मागण्या :
१) ड्रायव्हर महामंडळाची स्थापना करावी.यात राजकीय मंत्री नकोत.
२) परिवहनमंत्रीपदावर वाहतूक व्यवस्थाचा जाणकार ड्रायव्हर क्षेत्रातील व्यक्ती बसवावा.
३) ड्रायव्हर बांधवाचे ५ लाख रूपयापर्यतचे सर्वप्रकारचे कर्ज माफ करावे.
४) आर.टी.ओ.परिवहनाचे नियम व दंड रक्कम कमी करावे. बदल करावा.
५) ड्रायव्हरांना इ एस .आय. हाँस्पिटलची व पी.एफ.तसेच पेन्सन (पगार) सुविधा लागू करावी.
६)रस्तात ड्रायव्हर थकला असेल त्यासाठी आरामासाठी निवास , स्वच्छताग्रुह , पिण्याचे पाणी , व्यवस्था व शहरात सरकारी गेस्ट हाऊसला खाजगी ड्रायव्हरांसाठी राखीव हक्काच्या रूम द्याव्यात.
७)किमान वेतन पंधरा हजार रूपये करावे.
८) पेट्रोल डिझल दर कमी करावे.
असा अनेक मागण्या आहेत.यावर सरकारनी विचार करावा.अन्यथा यापुढे आंदोलन तिव्र होतील असाही इशारा श्री.जावळे यांनी दिला .
श्री. आण्णासाहेब जावळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here