महेश्वर तेटांबे यांच्या छायाचित्रचे टपाल तिकीट प्रसिद्ध.

0

मुंबई : नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक टपाल दिन सोहळ्यात (वल्ड पोस्ट डे) भारतीय डाक विभागाच्या दादर (पूर्व) मुंबई तर्फे चित्रपट दिग्दर्शक,पत्रकार महेश्वर तेटांबे यांचा यथोचित गौरव करून त्यांच्या छायाचित्रचे टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले. याप्रसंगी बी.एस.पठारे (प्रवर अधिक्षक डाकघर मुंबई पूर्व विभाग), सुभाष परब (वरिष्ठ डाकपाल, दादर हेड पोस्ट ऑफिस), भालचंद्र सुतार (डेप्युटी पोस्टमास्तर, दादर हेड पोस्ट ऑफिस) आणि विलास (बाळा) चोकेकर (जनसंपर्क अधिकारी, दादर हेड पोस्ट ऑफिस) आदी कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते.महेश्वर तेटांबे यांनी आतापर्यंत आस, अर्थ-स्वार्थ, शिदोरी, ७७७ रुपयात बाबा इत्यादी सामाजिक मराठी लघुचित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच तिरंगा–देशाभिमान , व्हॅलेन्टाईन डे – गिफ्ट, किन्नर एक संभावना, आणि बहन अशा अनेक वेब सिरीजचे देखील त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे. सिने क्षेत्राबरोबर सामाजिक बांधिलकी जपत महेश्वर यांनी कोरोना काळात काही मातब्बर संस्थेतर्फे गरजुना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, मास्क व सनिटायझर वाटप करणे अशा अनेक महत्वाच्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन आपले कर्तव्य बजावले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर-सांगली-चिपळूण जिल्ह्यातील उद्भवलेल्या पूरमय परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील पूरग्रस्तांना अन्नधान्य, कपडेलत्ते, शैक्षणिक मदत पोहोचवून आपली नैतिक जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कार्याचा गौरव म्हणुन काही मातब्बर सेवाभावी संस्थांनी त्यांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानीत केले आहे. नुकतंच त्यांनी औरंगाबाद मध्ये प्रथमच तेजस मेघा फिल्म्स प्रोडक्शन अंतर्गत फरफट या सामाजिक मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय महेश्वर यांचा आगामी मराठी सिनेमा “पुरस्कार” याचे देखील काम सुरु झाले आहे. महेश्वर तेटांबे यांनी दिलेल्या सामाजिक कार्याची त्यांनी दिलेल्या योगदानाची योग्य ती दखल घेऊन भारतीय डाक विभागाच्या दादर (पूर्व) मुंबई विभागाने त्यांना त्यांच्याच छायाचित्रचे टपाल तिकीट प्रसिद्ध करून त्यांचा गौरव केला. त्यांच्या या कर्तुत्वाचे आणि सामाजिक कार्याचे मुंबई महाराष्ट्रात कोतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here