कोपरा गावातील ये-जा करण्यासाठी बंद केलेला रस्ता पूर्वरत चालू : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत.

0

पनवेल (खारघर) वार्ता : काही दिवसापूर्वी खारघर शहरातील कोपरा गावामध्ये हुंदई शोरूम सेक्टर- १० समोरील रस्ता पी.डब्ल्यु.डी च्या अधिकार्यांतच्या मार्फत बंद करण्यात आला होता. कोपरा गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने याची शिवसेनेचे शाखा प्रमुख सचिन ठाकुर यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख यांच्या कडे निवेदणाद्वारे नागरिकांची व्यथा मांडली असता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी तत्काळ खारघर विभागातील पी.डब्ल्यु.डी च्या संबंधित अधिकार्‍यांना याबद्दल ची चौकशी करून बंद केलेला रस्ता पूर्वरत चालू करण्याकरिता निवेदणाद्वारे मागणी केली.सदर गोष्टीची दखल घेत पी.डब्ल्यु.डी च्या तुर्बे येथील विभागाने त्वरित रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना शिवसेना पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, उपशहर प्रमुख प्रकाश गायकवाड व शाखा प्रमुख सचिन ठाकुर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here