सन्मान कोविड योद्धांचा

0

मुंबई : शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली व महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट खारघर* यांच्या वतीने कोविड काळामध्ये आप आपल्या विभागामध्ये देशासाठी, राज्यासाठी व समाजासाठी एक कर्त्यव्यनिष्ठ राहून आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याची दखल घेत कळंबोली येथील डॉ. प्रकाश माने, डॉ. रत्नराज चारू पाटील, डॉ. सुयोग पाटील, डॉ. अक्षय कोळेकर, डॉ. अनघा दिवे, डॉ. गौरीहार भगवान पाटील (तळोजे), डॉ. प्रमोद दाभाडे, विवेक शिंदे, डॉ. प्राजक्ता बाळासाहेब बोबडे, डॉ.प्रियंका भगत, डॉ. निखिल पाटील, अनिल मेटकरी, अमृत वड्डे, उमेश जाधव, सायली कनवाळु, लोकेश पाटील, इत्यादी कोविड योद्धांचा सन्मान शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या हस्ते कोविड योद्धा सन्मानपत्र  देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, शहर समन्वयक गिरीष धुमाळ, शहर प्रमुख रुपेश ठोंबरे, शिवसेना उत्तर भारतीय सेल चे सी.पि. प्रजापती, गिरीष गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, विभाग प्रमुख आकाश शेलार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here