भारतीय टपाल विभाग-दादर मुख्य कार्यालय, मुंबई तर्फे महेश कोकाटे (अनाजी पंत) यांचा जाहीर सत्कार.

0

मुंबई-दादर-प्रतिनिधी: जागतिक टपाल दिन ( ‘वल्ड पोस्ट डे’ ) भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे (नॅशनल पोस्टल वीक) नुकतंच अभिनेते महेश कोकाटे (अनाजी पंत) यांना त्यांच्याच छायाचित्रचे (MY STAMP) टपाल तिकीट प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी बी. एस. पठारे (प्रवरअधिक्षक डाकघर मुंबई पूर्व विभाग), सुभाष परब (वरिष्ठ डाकपाल, दादर हेड पोस्ट ऑफीस), भालचंद्र सुतार (डेप्युटी पोस्टमास्तर दादर हेड पोस्ट ऑफीस) आणि विलास (बाळा) चौकेकर (जनसंपर्क अधिकारी दादर हेड पोस्ट ऑफीस आदी कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते. महेश कोकाटे यांनी आपल्या करियर ची सुरुवात अशोक हांडे यांच्या मंगलगाणी दंगलगाणी आणि आवाज की दुनिया या वाद्यवृंद पासून केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा, टुरटुर, बिघडले स्वर्गाचे दार, तू फक्त राम म्हण, ऑल दी बेस्ट (तीन भाषेमध्ये), आलाय मोठा शहाणा, मोरुची मावशी अशी एकाहून एक प्रसिद्ध नाटकांतून आपल्या अभिनयाची झलक दाखविली. वाद्यवृंद-नाटक याबरोबर त्यांनी बंदिनी, परमवीर, साहेब बिबी आणि मी, अगं बाई सासुबाई आणि स्वराज्यरक्षक संभाजी इत्यादी लोकप्रिय मालिकेत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. झी वाहिनीवर अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेतील अनाजी पंत ही त्यांची व्यक्तिरेखा विशेष गाजली. मालिकेबरोबर त्यांनी प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या खररनाक, चिमणी पाखरे आणि पछाडलेला या लोकप्रिय सिनेमात तसेच श्री राम समर्थ आणि बिबट्या या सिनेमात देखील आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. सध्या त्यांच्या ताराराणी आणि अबोली ह्या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.महेश कोकाटे यांनी सिने-नाट्य रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या उल्लेखनीय आणि दैदिप्यमान कार्याची पोचपावती म्हणुन भारतीय टपाल विभागाने त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीट (MY STAMP) प्रसिद्ध करून त्यांचा योग्य तो सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मुंबई-महाराष्ट्रात विशेष कौतुक होत आहे. धन्यवाद: ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here