नागरी नाशिक-२ प्रकल्पातील अंगणवाडी केंद्र क्र. ७५ च्या अंगणवाडी सेविका कल्पना योगेश जाधव देत आहेत.३ ते ६ वयोगटातील बालकांना व्हाट्सअपद्वारे पूर्व शालेय शिक्षण कोरोनाचे पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या उपक्रमात ठेवले आहे सातत्य लाभार्थींच्या पालकांकडूनही होते आहे या कामाचे कौतुक – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

0

नाशिक : 👉कोरोनाचे संकटामुळे १४ मार्च २०२० पासून आजही सुरक्षिततेच्या कारणास्तव ३ ते ६ वयोगटातील बालकांना पूर्व शालेय शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्रात बोलाविले जात नाही.. सदरचे पूर्व शालेय शिक्षण हे एबाविसेयो आयुक्तालयाचे ९ एप्रिल २०२० चे पत्रानुसार सर्व लाभार्थींचे पालकांचे व्हाट्सअपगृप तयार करुन त्याद्वारे दिले जात आहे…यात आयुक्तालय व युनिसेफ यांचे समन्वयाने प्रत्येक महिन्यातील प्रत्येकी १५ दिवसांचे अंतराने दैनंदिन दोन उपक्रम घेण्याचे वेळापत्रक प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडी सेविकांना दिले जाते..त्यानुसार दैनंदिन उपक्रम राबाविले जातात.बालकांचा सर्वांगिण विकास यामुळे साधला जात आहे..अंगणवाडी सेविका कल्पना योगेश जाधव यांनी सांगितले कि, आम्हाला दर महिन्याला १५-१५ दिवसांचे वेळापत्रक प्राप्त होते..तसेच घ्यावयाच्या दैनंदिन उपक्रमांचे व्हिडिओही लाभार्थी वयोगटानुसार प्राप्त होतात..मी माझ्या लाभार्थीचे पालकांना प्रत्येक उपक्रमाचे, मी स्वतः तयार केलेले व्हिडिओ दररोज पाठविते..त्याप्रमाणे पालक बालकांकडून उपक्रम करुन घेतात..बालकांनी स्वतः केलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ व फोटो पालक मला पाठवतात..पालक स्वतः उपक्रमांत सहभागी होवून पालकांकडून हे सर्व दैनंदिन उपक्रम करुन घेतात..माझ्या कार्यक्षेत्रातील बालक व पालकांचा गत दिड वर्षापासून यात सातत्यपूर्ण सहभाग आहे..या कामी आम्हाला वरिष्ठ अधिकारीवर्गाचे मार्गदर्शन मिळत आहे.मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी सांगितले कि, आमच्या प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांसोबतच अंगणवाडी मदतनिसही हे उपक्रम स्वतः करतात..तसेच पालकांमार्फत लाभार्थींकडूनही हे उपक्रम करुन घेतात..कालांतराने अंगणवाडी केंद्रात ३ ते ६ वयोगटातील बालके पूर्व शालेय शिक्षणासाठी येतील..तरीही आम्ही त्यासोबतच व्हाट्सअपद्वारे दिले जाणारे शिक्षण आमच्या नागरी नाशिक-२ प्रकल्पात सुरुच ठेवणार आहोत..राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१चे कालावधीतही या उपक्रमात आम्ही सातत्य राखलेले आहे.या कामकाजाचे पालकवर्गाकडून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here