राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा दररोज दोन नव्या पाककृती तयार करतात अंगणवाडी सेविका रंजना निकम पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे – कौतुक मयूरी महिरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

0

नाशिक :  दिनांक १ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ सर्वत्र साजरा केला जातो आहे..याकालावधीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अधिनस्त अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे दैनंदिन वेळापत्रकानुसार आयोजन केले जाते आहे.पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणेसाठी जन आंदोलन उभारले जात आहे..यात विविध थीमवर आधारीत उपक्रम राबवून कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता सोशल मिडियाचा जास्तीत-जास्त वापर करुन जनजागृती केली जात आहे..नागरी नाशिक-२ प्रकल्पांतर्गत भगूर नगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या अंगणवाडी केँद्र क्र. ५२ च्या अंगणवाडी सेविका रंजना रत्नाकर निकम या पोषण महिन्याचे औचित्यसाधून लाभार्थींना पोषणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा पाककृती दररोज दोन याप्रमाणे बनवून त्या व्हाट्सअपगृपद्वारे पालकांपर्यंत पोहोचवत आहेत..सदर पाककृती सोशल मिडियावर व्हायारल केल्या जात आहेत..जेणेकरुन इतर नागरिकांनाही याचा फायदा व्हावा.रंजना निकम या फक्त पाककृतीच तयार करत नसून त्या पाककृतीची सविस्तर माहिती, त्यासाठी लागणारे साहित्य, पाककृतींचा लाभार्थींना होणारा फायदा याबाबीही त्या सर्वांपर्यंत सोशल मिडियाद्वारे मेसेज करुन पोहोचवत आहेत..यासर्व पाककृती स्थानिक पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या वापरुन बनविल्या जाताता.ह्या पाककृतींद्वारे लाभार्थी/पालकांना स्थानिक पदार्थाँचा आहारात वापर व उपयोग याबाबीही पटवून दिल्या जात आहेत..रंजना निकम यांच्या या अभिनव उपक्रमाचे पालकवर्गाकडून कौतुक केले जात असलेची माहिती मुख्यसेविका मयूरी महिरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here