एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ कालावधीत किशोरवयीन मुली,गरोदर महिला, स्तनदा माता यांचेसाठी अॕनिमिया तपासणी, उपचार व समुपदेशन शिबीरांचे आयोजन – शितल गायकवाड मुख्यसेविका

0

नाशिक : 👉१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ साजरा केला जातो आहे..यात जनजागृती करुन पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणेसाठी जन आंदोलन उभारले जात आहेत.एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात महानगरपालिकेच्या समन्वयाने तर नगरपालिका कार्यक्षेत्रात जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अधिनस्त असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे व संंबंधित नगरपालिका यांचे समन्वयाने किशोरवयीन मुली, गरोदर,महिला व स्तनदा मातांसाठी अॕनिमिया तपासणी, उपचार व समुपदेशन शिबीराचे आयोजन केले जात आहे..यात उपस्थितांना आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन ही केले जाते आहे..नागरी नाशिक-२ प्रकल्पांतर्गत मखमलाबाद, मोरवाडी या ठिकाणी हे शिबीर संपन्न झाले आहे..तर देवळालीगांव, म्हसरुळ, सातपूर व मनमाड या ठिकाणच्या शिबीरांचे नियोजन राष्ट्रीय पोषाण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत केले असल्याची माहिती मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here