एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक- २ व नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाचे समन्वयाने राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मधील जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती व मदतनिस (AAAA) यांच्या कार्यक्षेत्रात सुरु आहेत संयुक्त गृहभेटी- पुष्पा वाघ मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक २

0

नाशिक .दिनांक १ सप्टेंबर २०२१ पासून राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ सर्वत्र साजरा केला जातो आहे..यात पोषणाचे वर्तणात बदल घडविणेसाठी १ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत कोरोनाचे सर्व नियमपाळून सोशल मिडिया व प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे जनजागृती केली जात आहे..यामाध्यमातून जन आंदोलन उभारले जावे हा हेतू आहे…या कामात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी क्षेत्रिय स्तरावरील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती व मदतनिस (AAAA) यांचा समन्वय असणे फार आवश्यक आहे.नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरी नाशिक-२ प्रकल्प व महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा चांगला समन्वय आहे..हा समन्वय सप्टेंबर २०१८ पासून अभियनात सातत्यपूर्ण एकत्रित कामकाज करुन या विभागांनी कायम ठेवला आहे..याचा फायदा लाभार्थी सर्वोच्च हित साध्य करण्यासाठी होणार आहे..राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मध्ये ही AAAA ची टिम कोरोनाचे सर्व नियमपाळून घरोघरी जावून नागरिकांना पोषण महिन्याच्या सर्व थीमसह, तरंग सुपोषित महाराष्ट्राचा, कोरोना लसिकरण, पौष्टिक आहार, स्थानिक पदार्थांचा आहारात जास्तीत-जास्त वापर करणे, स्वच्छता, परसबागा, योगाचे महत्व, चौरस आहार, गरोदर महिला, स्तनदा माता व सॕम बालकांची काळजी इ. विषयांवर मार्गदर्शन करत आहे..अशी माहिती मुख्यसेविका पुष्पा वाघ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here