कोरोना संकटकाळात व्हाट्सअपद्वारे सुरु केलेले ३ ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थींसाठीचे पूर्व शालेय शिक्षण आजही आहे त्याच पद्धतीने सुरु, नाशिक (नागरी)- २ प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांबरोबरच मदतनिसही घेत आहेत उपक्रम – सुज्ञा खरे मुख्यसेविका

0

मुंबई – 👉एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ येथील अंगणवाडी केंद्रांतील ३ ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थींना आजही कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता पूर्व शालेय शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये बोलाविले जात नाही.दिनांक ९ एप्रिल २०२० रोजी एबाविसेयो आयुक्तालयाने लेखी निर्देश देवून ३ ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थींपर्यंत पूर्व शालेय शिक्षणाचे उपक्रम पोहोचवावेत व हे उपक्रम पालकांनी लाभार्थांकडून त्यांच्या वयोगटानुसार करुन घ्यावेत..यासाठी एबाविसेयो आयुक्तालय व युनिसेफ यांचेमाध्यमातून अंगणवाडी केंद्रांसाठी प्रत्येक महिन्यात १५ दिवसांचे कालावधीसाठी असे संपूर्ण महिन्याचे दैनंदिन वेळापत्रक व उपक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध करुन दिले जातात.हृया दैनंदिन व्हिडिओनुसार व उपक्रमानुसार प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनिस स्वतः उपक्रमांचे व्हिडिओ बनवून लाभार्थींचे पालकांसाठी तयार केलेल्या व्हाट्सअप गृपवर पाठवितात.त्यानुसार पालक मोठ्या उत्साहाने बालकांकडून हे उपक्रम करुन घेतात व त्यांनी घेतलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ व फोटो अंगणवाडी सेविकांकडे पाठवितात.हा उपक्रम १५ एप्रिल २०२० पासून दैनंदिन सुरु आहे..आम्ही स्वतः उपक्रमांचे व्व्हिडिओ बनवितो कारण कार्यक्षेत्रातील लाभार्थींं बालके व पालक हे अंगणवाडीताईं, मदतनिसताई म्हणून आम्हाला ओळखतात.त्यामुळे आमच्यासारखे उपक्रम करण्यासाठी ते लगेच तयार होतात..जरी कालांतराने अंगणवाडीत बालके येवून पूर्व शालेय शिक्षण पूर्ववत अंगणवाडी केंद्रात देणे सुरु झाले.तरीही आम्ही हा व्हाट्सअपद्वारे शिक्षणाचा उपक्रमही सुरुच ठेवणार असल्याचे व राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ कालावधीत याचे महत्व पालकांना आणखी समजावून सांगणार असल्याचे मुख्यसेविका सुज्ञा खरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here