
मनमाड दि. 15 – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या नाशिक जिल्हा युवक मेळावा, प्रवेश व पदग्रहण सोहळा हाॅटेल श्रिलिला इंटरनॅशनल मनमाड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता .या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशीक मनपाचे मा.नगरसेवक तसेच जिल्हा सरचिटणीस संजयजी भालेराव तर स्वागत अध्यक्ष उत्तर महा.युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक जिल्हा ग्रामिण सचिव कपीलजी तेलुरे यांनी केले यावेळी मनमाड शहरासह निफाड ,नाशीक,येवला,नांदगाव तालुक्यातील सह नंदुरबार अहमदनगर जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते निळ्या टोप्या घालुन प्रवेश करण्यात आला.रिपब्लिकन पक्षाला विशिष्ठ जाती पुरते मर्यादीत न ठेवता सर्व जातीधर्मातील पानेवाडी येथिल चर्मकार युवा नेते रविंन्द्रजी नगे यांच्यासह असंख्य युवकांनी केंन्द्रिय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेउन पक्षात प्रवेश केला. नंदुरबार तालुका अध्यक्ष अधिकृत निवड सर्वामते करण्यात आलीची निवड करण्यात आली .याप्रसंगी अहमदनगर जिल्हाध्यक्ष अमितजी काळे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा.सुभाषजी पानपाटील ,चांदवड तालुकाध्यक्ष महावीर संकलेचा , कामगारनेते रामबाबा पाठारे ,विशाल घेगडमल.फेडरेशन नाशिक कार्याध्यक्ष आय टी सेल चे नाशीक जिल्हाध्यक्ष आकाश घुसळे,जिल्हा युवक कार्येध्यक्ष संदीप पवार, येवला युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब कसबे नांदगाव शहर अध्यक्ष आकाश थोरात आदी उपस्थित आगामी काळात महानगर पालिका आणि नगर पालिका निवडणुकीबाबत रिपब्लिकन पक्षाची रणनीती बैठकीत विचार विनिमय करण्यात आली. कोरोनाच्या प्रसाराला निर्बंध घालणारे नियम पाळून हा मेळावा आयोजीत करण्यात होता कार्यक्रम यशस्वी करण्या साठी गोरखसेठ चौधरी, दिपक साळवे,साइनाथ पगारे,राजेंन्द्र धिवर,आदी.नी परिश्रम केले,
