सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बुद्रूक ते रानमाळ वाडी 2 किमी,व संस्थान वाडी ते उटाडे वाडी 2.5 रस्त्याची अवस्था बिकट,संबधीत रहीवाशांना सोसावे लागतात मरन यातना

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सावखेडा बुद्रूक ता. सिल्लोड गावापासून रानमाळ वाडी 2 किमी,व संस्थान वाडी ते उटाडे वाडी 2.5 या एकुन 4.5 किमी रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली आहे,या तिन्ही लोकवस्तीवर साधारण 1 हजार बाराशे जणाचे वास्तव्य करतात व सर्व रहीवाशाना दरवर्षी पाऊसाळा सुरू झाला की साधारण 6 ते 7 महीने चिखलातुन वाट काढत मरन यातना भोगाव्या लागतात, व या कालावधीमध्ये प्रस्तुती किवा दु:खत घटना घडलीतर फारच नसांगण्या सारखा प्रसंग संबधीतावर ओठावत असतो,या रस्त्या विषयी गावकऱ्यांच्या शिस्ट मंडळाने आमदार व खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे दोन-तीन वेळी या खराब रस्त्याचे फोटो, लेखी निवेदनासह पुरावे देऊन सुध्दा दोन्हीवेळा सुध्दा त्यांच्याकडुन गावकऱ्यांना चकवा देत असे सांगण्यात आले कि निवडणुका होऊ द्या नतंर लगेच हा रस्त्याचे काम करुन टाकु,निवडणुका सपंताच खासदार यांचे आश्वसन फुर्र,यानंतर जि.प,पंचायत समिती,सदस्यसह संबधीत सर्व विभागाकडे अनेकवेळी लेखी तोडी अर्ज व सांगुन सुध्दा शेवटी या रहीवाशाच्या पदरी निराशाच आली आहे,याच्या मागणीकडे सर्वान कडुन दुर्लक्षच करण्यात आले आहे,या प्रकारामुळे लोकप्रतिनिधी व संबधीत विभागा विरोधात संतापाची लाट दिसुन येते,या सर्व रानमाळ लोकवस्तीपर्यंत दोन किलोमीटर अतंराच्या रस्त्या व संस्थान वाडी ते उटाडे वाडी 2.5 किमी रस्त्याची अवस्था खुपच बिकटची अत्यंत दयनीय झाली असल्याने नागरिकांना जाण्या- येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत अाहे ,व हा रस्ता खुप चिखलमय झाला असल्यामुळे वाट शोधतांना कसरत करावी लागत आहे,एखाद वेळा रात्री-अपरात्री हा रस्ता वाहनाधारकासाठी साठी मोठा घातक ठरत आहे,परिसरातील बहुतांश रस्त्याची गेल्याअनेक दिवसांपासून अक्षरशः वाट लागली आहे,जागोजागी लहान मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करवा लागत आहे. रस्ताचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, ही मागणी परिसरातील नागरिकांनी लावून धरली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर नेहमी चिखल असल्याने दैनंदिन कामासाठी जाणे-येणे कठीण झाले आहे,तरी संबधीत लोकप्रतिनिधीनी व सबंधीत विभागाने रानमाळ वाडी 2 किमी,व संस्थान वाडी ते उटाडे वाडी 2.5 या एकुन 4.5 किमी रस्त्याची पाहणी करुन या लोकवरस्तीवरील लोकाच्या मरन यातना सपंवुन रस्ता दुरूस्तीकड लक्ष देऊन काम करावे अशी मागणी नागरीकांतुन शेतकऱ्यांतुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here