कलावंत महिलेचा अपमान महाराष्ट्रातील महिला कदापि सहन करणार नाही-डॉ. सौ नूतन आहेर

0

वासोळ ( प्रतिनिधी प्रशांत गिरासे मो.9359228067 ) देवळा-महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते लोककलाकार व महिलांचा आदर ही संस्कृती महाराष्ट्राने सदैव जोपासली आहे असे असताना महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय प्रवीण दरेकर यांनी महिला कलावंत असलेल्या सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश या अनुषंगाने काढलेले अनुचित उद़गार हे महिलांविषयी त्यांची असलेली तोकडी मानसिकता दर्शवतात त्यांनी शब्दांची कसरत करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला परंतु नेमक्या सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे वेळीच त्यांना असा वाक्प्रचार कसा सुचला? यावरून त्यांची विचारसरणी लक्षात येते त्यांनी सर्व महिलांची त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ.नूतन सुनील आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here