राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत कोरोना लसिकरणाबाबत जनजागृतीसाठी प्रत्यक्ष गृहभेटीबरोबरच सोशल मिडियाचाही केला जातो आहे वापर.अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका,मदतनिस,आशा कार्यकर्ती (AAAA) करत आहेत नागरिकांना याबाबत मार्गदर्शन- शितल गायकवाड मुख्यसेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना (प्रकल्प) नागरी नाशिक-२.

0

नाशिक : 👉संपूर्ण देशभरात सप्टेंबर २०१८ पासून १ ते ३० सप्टेंबर याकालावधीत राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जातो..या ही वर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो आहे..एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत नाशिक,मनमाड,भगूर,येवला या नागरी भागातील १०० अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात व परिसरातही अंगणवाडी सेविका सोशल मिडियाद्वारे जनजागृती करत आहेत..तसेच प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या १ ते ३० सप्टेंबर २०२१ साठीच्या दैनंदिन वेळापत्रकानुसार उपक्रमही घेत आहेत..कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेवून जास्तीत-जास्त नागरिकांचे कोरोना लसिकरण पूर्ण व्हावे..यासाठी प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी मेहनत घेवून कोरोना लसिकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वतः व्हिडिओ तयार केलेले आहेत..सदर व्हिडिओ हे पालक,परिसरातील नागरिक व इतरही ठिकाणच्या नागरिकांपर्यंत व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम, शेअर चॕट, ट्विटर इ. चा वापर करुन पोहोचविले जात आहेत..हे व्हिडीओ तयार करतांना स्थानिक लोककलांचा ही वापर केला गेला आहे..या जनजागृतीद्वारे जास्तीत-जास्त नागरिकांचे कोरोना लसिकरण पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केला जातो आहे.. प्रकल्पातील आदर्श अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा जगदिश अडसुळे यातर परिसरात सायकल फेरी काढून याबाबत जनजागृती करत आहेत..यासाठी त्यांनी कोरोनाबाबत जनजागृतीपर असे विविध संदेश असलेल्या चित्रांनी सायकल सजविलेली आहे..त्या जागोजागी थांबून कोरोना लसिकरण करुन घेणेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.जनजागृती करतांना गृहभेटींवरही भर दिला जात असून, अंगणवाडीसेविका,आरोग्यसेविका, मदतनिस,आशा कार्यकर्ती या संयुक्त (AAAA) गृहभेटीद्वारे गरोदर महिला व स्तनदा माता यांना कोरोना लसिकरण करुन घेणेबाबत मार्गदर्शन करत आहेत..तसेच मास्क, सुरक्षित अंतर ठेवणे,सॕनिटायझरचा वापर करणे याबाबतीतही मार्गदर्शन केले जात आहे..कार्यक्षेत्रात कोरोना लसिकरणाबाबत शिबीरे आयोजित करण्यात आल्याची व या शिबीरांत काही महिलांनी लसिकरणही करुन घेतल्याची माहिती मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here