राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत जनजागृतीसाठी तयार केलेले व्हिडिओ सोशल मिडियाचे माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचविणार – मयुरी महिरे.मुख्यसेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना (प्रकल्प) नागरी नाशिक-२

0

नाशिक: 👉संपूर्ण देशभरात सप्टेंबर २०१८ पासून १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा केला जातो..या ही वर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो आहे..एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत नाशिक,मनमाड, भगूर, येवला या नागरी भागातील १०० अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात व परिसरातही अंगणवाडी सेविका सोशल मिडियाद्वारे जनजागृती करत आहेत.तसेच प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या १ ते ३० सप्टेंबर २०२१ साठीच्या दैनंदिन वेळापत्रकानुसार उपक्रमही घेत आहेत..कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेवून प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः मेहनत घेवून जनजागृतीसाठी व्हिडिओ तयार केलेले आहेत.एक टिम तयार करुन या सेविकांनी पोषण महिन्याच्या विविध थीमवर तयार केलेले व्हिडिओ हे पालक,परिसरातील नागरिक व इतरही लोकांना जनआंदोलन उभारले जावे या हेतूने व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम, शेअर चॕट, ट्विटर इ. चा वापर करुन पाठविले जात आहेत..हे व्हिडीओ तयार करतांना स्थानिक लोककलांचा ही वापर केला जातो आहे..या जनजागृतीमुळे पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे..तसेच यामुळे सक्षम महिला, सुदृढ बालक व सुपोषित महाराष्ट्र बनणार आहे.अशी माहिती मुख्यसेविका मयुरी महिरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here