ओबीसी आरक्षणावरुन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

0

मुंबई : प्रतिनिधी: अवधुत सावंत: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा आणि पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील महानगर पालिका, नगर पालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होण्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here