सोशल मिडियाचा प्रभावी वापर कोरोनाचे पार्श्वभूमीवर संकटकाळात व्हाट्सअपद्वारे बालकांसाठी सुरु केलेले पूर्व प्राथमिक शिक्षण आजही आहे प्रभावीपणे सुरु..पालकांकडून होते आहे अंगणवाडीताई व मदतनिसताईंच्या कामाचे कौतुक..राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१मध्येही सुरु आहे शिक्षण.सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

0

नाशिक: कोरोना संकटकाळात मार्च २०२० पासून अंगणवाडीतील बालकांना आजही पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी बोलावले जात नाही..या बालकांना व इतरही लाभार्थींना व्हाट्सअपद्वारे सेवांबाबत मार्गदर्शन करावे अशा सुचना आयुक्तालयाने ९ एप्रिल २०२० रोजी दिल्यात..त्यानुसार प्रकल्पात सर्व अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात लाभार्थींचे पालकांचे ४ प्रकारचे व्हाट्सअप गृप स्थापन करण्यात आले..यात ३ ते ६ वयोगटातील लाभार्थींना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठीही पालकांचा व्हाट्सअपगृप स्थापन करण्यात आला..युनिसेफचे माध्यमातून तयार केलेले पूर्व प्राथमिक शिक्षणाचे प्रत्येकी १५ दिवसांचे दैनंदिन वेळापत्रक प्रत्येक महिन्यात २ वेळा एबाविसेयो आयुक्तालयामार्फत सर्व बाल विकास प्रकल्पांना व त्यांचेकडून अंगणवाडी केंद्रांना पाठविले जाते..यात दिलेल्या उपक्रमांनुसार बालकांना प्रभावीपणे पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचे कामकाज प्रकल्पातील अंगणवाडीताई करत आहेत..या कामात त्यांना मदतनिसताईंचीही मोलाची साथ मिळत आहे..१० एप्रिल २०२० पासून सुरु केलेले हे काम नागरी नाशिक-२ प्रकल्पात आजही त्यात पद्धतीने सुरु आहे…याकामी दैनंदिन उपक्रमांनुसार स्वतः अंगणवाडीताई व मदतनिसताई दररोज व्हिडीओ बनवतात..असे व्हिडिओ पालकांच्या व्हाट्सअप गृपवर दररोज पाठविले जातात.. त्यातून बालकांचे विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबी पालकांना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या जातात..यामुळे बालक व पालक यांचाही उत्साह टिकून आहे…👉मुख्यसेविका सुज्ञा खरे यांनी सांगितले कि, कुठलेही संकट हे चांगली सधीही घेवून येत असते..कोरोना संकटाने आम्हाला सोशल मिडियाचा प्रभावी वापर करायला शिकविले आहे..आमच्या ताई आजही यातील व्हाट्सअपचा वापर करुन बालकांना सक्षमपणे पूर्व प्राथमिक शिक्षण देत आहेत..पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी पुन्हा अंगणवाडी केंद्र सुरु झाल्यावरही आम्ही हे कामकाज असेच सुरु ठेवणार आहोत…या कामकाजाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here