आदर्शवत कामकाज करणाऱ्या अंगणवाडीसेविका- ज्योती चौधरी

0

नाशिक : आदर्शवत कामकाज करणाऱ्या अंगणवाडीसेविका…. ज्योती चौधरी👉एकात्मिक बाल विकास सेवा योजना (नागरी) नाशिक-२ प्रकल्पातील देवळालीगावं विभागात कार्यरत असलेल्या अंगणवाडीसेविका ज्योती चौधरी यांचे नियोजनबद्ध सातत्यपूर्ण कामकाज हे अनेकांनी आदर्श घ्यावा असेच आहे..त्यांचेकडे सध्या अंगणवाडी क्र. ३४ व ३७ अशा दोन केंद्रांचे कामकाज आहे..लाभार्थी हित डोळ्यासमोर ठेऊन त्या कायम आपल्या कामकाजाबाबत दक्ष असतात..कार्यक्षेत्रातील लाभार्थींची नियमित वजन व उंची घेणे, पूर्व प्राथमिक शिक्षण, गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरी मुली, ० ते ६ वयोगटातील बालके यांना पात्रतेनुसार विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या कायम प्रयत्नशिल असतात..गृहभेटी व अंगणवाडीस्तरावरील विविध कार्यक्रमांचे माध्यमातून त्या सतत लाभार्थी व पालकांचे संपर्कात असतात..तसेच विभागीत अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शनही करतात..त्यांना कामकाज करतांना अंगणवाडी मदतनिस वैशाली वाघमारे यांचीही मोलाची साथ मिळते..कोरोनाचे पार्श्वभूमीवर त्या आजही कामकाज करत आहेत..यातील पिडीत कुटुंबांना लाभ मिळावा यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे..आदर्शवत कामकाजामुळे त्यांना यापूवी एकदा विभागस्तरावर पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here