घाटनांद्रा घाट बनला म्रुत्युचा सापळा घाटात पडलेल्या भगदाडामुळे अपघाताला  निमंत्रण :- घाटातील समस्यांकडे सा.बा.चे दुर्लक्ष,दुरुस्ती करण्याची मागणी

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे- घाटनांद्रा येथुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या व खान्देश भागात जाण्यासाठी मधला व जवळचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा घाटनांद्रा पाचोरा घाटातील रस्त्याची गेल्या वर्षी पासुन अत्यंत वाईट दुरावस्था झाली असून नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील रस्ता ठिकठिकाणी जास्त प्रमाणात खचल्याने मोठमोठे भगदाडे पडली आहे.त्यामुळे हा घाट वाहनधारकांसाठी आता म्रुत्युचा सापळा बनला आहे. प्रशासनाने वेळीच याची गंभीर दखल घेऊन रस्त्यावर पडलेल्या भगदाडाची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.कित्येक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही सा.बा.चे अधिकारी थातुरमातुर पद्धतीने  तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करतात व मोकळे होतात,पुन्हा पाऊस आला की टाकलेला भराव वाहुन जातो व पुन्हा भगदाडे पडतात, त्यामुळे घाटातील समस्या गांभिर्याने घेण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.खान्देश भागाला जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक 48 व पुढे गुजरात सुरत जळगाव राजस्थान मध्यप्रदेश आदी ठिकाणी जाण्यासाठी हा मधला  व जवळचा महामार्ग म्हणुन ओळखला जातो.या मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते.तर
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड चाळीसगाव घाटात दरड कोसळल्यामुळे घाटात सुरू असलेल्या डागडुजीच्या कामामुळे हा घाट वाहतूकुसाठी काही दिवसांकरिता  बंद ठेवला आहे त्यामुळे या घाटातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.तर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे घाटात टाकलेला डांबर नरम झाल्याने घाटात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर भगदाडे पडली असून रस्ता ठिकठिकाणी खचत चालला आहे. त्यामुळे अवजड वाहन आल्यास वाहन दरीत पलटी होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घाट पार करत असताना वाहनधारकांना अनेक समस्या पार करत हा घाट पार करावा लागतो, विशेष म्हणजे या घाटातील वळण रस्त्यांना संरक्षण कठडे नसल्यामुळे रस्त्याला पडलेल्या भगदाडामुळे  वाहण थेट दरीत कोसळण्याची भिती निर्माण झाली असुन या नवु किलोमीटर असलेल्या घाटाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन घाटात असलेल्या अनेक समस्या दुर कराव्यात अशी मागणी सरपंच निर्मलाताई यासीन तडवी, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्‍वर मुकणे,मोसीन पठाण,शिवनाथ चौधरी,संतोष राजपुत,अजहर शाह,अशोक गुळवे,मुजीब मुल्ला,रितेश महाले,सईद पठाण व असंख्य प्रवाशी व वाहनधारकांनी केली आहे.
या रस्त्यासंबधी कायम स्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे :- खचलेल्या रस्त्याची शनिवार रोजी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे, यापुर्वी देखील दोन वेळा हा खचलेला भाग भरण्यात आला होता परंतु नुकतीच या भागात अतिवृष्टी पाऊस झाल्याने पुन्हा हा भाग खचला आहे याविषयी कार्यकारी अभियंता भगत यांच्या कडे प्रस्ताव सादर केला असून दोन तीन दिवसात ते स्वतः हा येऊन या खचलेल्या रस्त्याची पाहणी करणार आहेत व कायम स्वरुपी या रस्त्याबाबत असलेल्या उपाय योजना करुन  लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे उपभियंता खडीकर यांनी सांगितले.
घाटनांद्रा घाटा ची गेल्या कित्येक दिवसांपासून दुरावस्था झाली असून मी रोज पिंप्री येथुन घाटनांद्रा येथील शाळेवर अपडाऊन करतो घाटात असलेल्या अनेक समस्या पार करून घाट पार करावा लागतो,तर घाटातील अनेक धोकादायक वळणावर भगदाडे पडली असल्याने घाट म्रुत्युचा सापळा बनला आहे.पडलेल्या भगदाडांची सा.बा.वि.लवकर दुरुस्ती करावी:शिक्षक जितेंद्र गायकवाड,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here