पोषण महिना सप्टेंबर २०२१ ची प्रभावी जनजागृती व्हावी यासाठी मेहनत घेणाऱ्या – आदर्श अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुळे

0

नाशिक :  👉एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ हा शहरी भागातील १०० अंगणवाडी केंद्रा़चा प्रकल्प त्यातही नाशिक महानगरपालिका, मनमाड, येवला व भगूर या नगरपालिका क्षेत्रात कार्यक्षेत्र असलेला हा प्रकल्प आहे.या प्रकल्पाने सप्टेंबर २०१८ पासून पोषण अभियानात सातत्यपूर्ण कामकाज केलेले आहे..त्यामुळे या प्रकल्पातील अंगणवाडीसेविका, मदतनिस, आरोग्य सेविका, आशा सेविका, मुख्यसेविका या टिमचा आॕगस्ट २०१९ मध्ये राष्ट्रीय स्तरावर महिला व बाल विकास मंत्री मा. स्मृती इराणी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला आहे..आजही या प्रकल्पातील अंगणवाडीताई याच उत्साहाने कामकाज करत आहेत..याची प्रेरणा या ताईंना अन्नपूर्णा जगदिश अडसुळे या अंगणवाडी केंद्र क्र.६७ मनमाडच्या अंगणवाडीताईने दिली…आज कोरोनाचे पार्श्वभूमीवर जनजागृती कशी करावी हा प्रश्न असतांना या प्रकल्पातील ताईंनी एकजूटीने नियोजन करुन हा प्रश्नही मार्गी लावला आहे…काही अंगणवाडीताईंनी एकत्र येवून सोशल मिडियाचा वापर जनजागृती करण्यासाठी करायचे ठरविले व त्यांनी उपयुक्त असे छोटे- छोटे व्हिडीओ तयार केलेत..हे व्हिडीओ लाभार्थी पालकांपर्यंत पोहोचविले जात आहेत..आज ही हे काम सुरु आहे..यासाठी या सर्व ताई आपले अंगणवाडी केंद्राचे मुळ कामकाज सांभाळून सुट्टीच्या दिवसासह अतिरिक्त वेळ देवून हे व्हिडीओ तयार करत आहेत..यासाठी अन्नपूर्णा अडसुळे, पुष्पा वडजे, सविता तायडे, किर्ती पाचपांडे, पद्मा निरभवणे, सुहासिनी कसोटे, वंदना हिवाळे, कुसुम कासव, अलका लोखंडे या अंगणवाडी सेविका मेहनत घेत आहेत..आतापर्यंत १२ व्हिडीओंचे काम पूर्ण झाले असून हे सर्व व्हिडीओ सोशल मिडियाद्वारे जनजागृतीसाठी वापरले जात आहेत..लाभार्थी व पालक, परिसरातील नागरिक यांचेकडून या कामाचे कौतुक केले जात आहे..हे सर्व व्हिडीओ बनविणेसाठी या अंगणवाडी सेविकांना पुष्पा वाघ व शितल गायकवाड या मुख्यसेविकांचे मार्गदर्शन लाभत आहे..राष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त अन्नपूर्णाताई अडसुळे यांचे संपूर्ण कुटुंबच नाशिक (नागरी) २ प्रकल्पाला याकामी स्वेच्छेने मदत करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here