अंगणवाडी केँद्र परिसरात फुलविली सुंदर परसबाग राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मध्ये परसबागेबाबत (पोषण वाटिका) जनजागृती करणार – पुष्पा वडजे

0

नाशिक : अंगणवाडी केँद्र परिसरात फुलविली सुंदर परसबाग राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मध्ये परसबागेबाबत (पोषण वाटिका) जनजागृती करणार …पुष्पा वडजे अंगणवाडी सेविका म्हसरुळगांव👉एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक २ प्रकल्पातील अंगणवाडी केद्र क्र. १ म्हसरुळगांव येथील अंगणवाडी सेविका पुष्पा वडजे यांनी मेहनत घेवून अंगणवाडी केंद्र परिसरात एक सुंदर परसबाग फुलविली आहे..यासाठी त्यांनी गत तीन वर्षापासून मेहनत घेवून शेवगा, वाल,कडीपत्ता, डांगर, कारली, दोडगा,आळू,भुईमुग, भोपळा, कोरपड, चक्की, कांदापात इ. उपयुक्त बाबींची लागवड केली आहे..पुष्पा वडजे यांनी सांगितले कि, गत तीन वर्षापासून आम्ही पोषण अभियानाचे माध्यमातून “पोषणाचे वर्तनात बदल घडविणेसाठी” सातत्यपूर्ण कामकाज करत आहोत…आपल्या आहारात स्थानिक पालेभाज्या, फळभाज्यांचा समावेश असावा ही बाब आम्हाला पटली आहे..यासाठी मी व अंगणवाडी मदतनिस मनिषा शिंदे या दोघीही पालकांना व स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन करत आहोत..तसेच शहरी भागात परसबागेसाठी जागेचा प्रश्न असला तरी नागरिकांना घराचे गच्चीवर व कुंडीमध्ये परसबाग बनवीने बाबत जनजागृती करणार आहोत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here