राजयोगीनी ब्रम्हाकुमारी मंगला दीदी यांच्या हस्ते रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

0

मनमाड : प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिवशक्ती भवन माधवनगर मनमाड येथे आदरणीय राजयोगीनी ब्रम्हाकुमारी मंगला दीदी यांच्या हस्ते रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी आदरणीय ब्रम्हाकुमारी गिता दीदी त्याच्या समवेत होत्या .रक्षाबंधन हा पवित्र सन बहीन भाऊ यांच्या पाविञ्याचे प्रतिक आहे.भारतातील हा महत्वपूर्ण उत्सव आहे.परमात्मा आपल्याला विकारांपासून रक्षा कशी करावी यासाठी परमात्मा रक्षासूञ बांधतात.विकार योगअग्नीने कसे भस्म करावेत याबाबत माहिती आदरणीय मंगला दीदींनी सांगून सर्वाना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी चांदोरी येथील कन्या स्वराक्षी ने छान नृत्य सादर केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमाड येथील आदरणीय ब्रम्हाकुमारी शितल दीदी, अर्चना दीदी, अमृता दीदी यांनी मेहनत घेतली.यावेळी चांदोरी,खेरवाडी,दुगाव व मनमाड मधील बहुसंख्य बांधव व माता भगिनींनी याचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here