कोरोनातही झालं नातं अतूट…! एफ/दक्षिण विभागातील साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल या मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या राख्या कोरोना योध्यांच्या मनगटी

0

मुंबई-परेल-आपला भारत देश हा संस्कृतीप्रधान आणि कृषीप्रधान देश आहे. या देशांत आपण अनेक सण.. उत्सव साजरे करतो. पण गेली दीड ते दोन वर्षे कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात आपण आपल्या अनेक उत्सव आणि सणापासून वंचित झालो आहोत. त्यातील महत्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा. भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्यांची वीण म्हणजे रक्षाबंधन . श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करण्याची प्राचीन परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे. जरी कोरोनाच सावट असलं तरी देखील फ / दक्षिण विभागातील साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल, परेल, लालबाग या मनपा शाळेत अनेक सहशालेय शैक्षणिक उपक्रम उत्तमरीत्या राबविले जातात. रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून यंदा या शाळेतील विद्यार्थ्यांनी थर्माकोल किंवा प्लास्टिकचा उपयोग न करता पर्यावरणाबद्दलची संवेदनशिलता जपत पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या.रक्षा बंधनाचे औचित्य साधून या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता कोरोना संकटाला सामोरे जाणाऱ्या आणि आपले संरक्षण करून कर्तव्य पार पडणाऱ्या केईएम इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर, वरिष्ठ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर तसेच सहाय्यक डॉक्टर्स, वॉर्ड बॉय, भोईवाडा व काळाचौकी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून यांच्या बद्दलचा आदर, प्रेम, ऋणानुबंध जपत विद्यार्थ्यांकडून सलामी देण्यात आली.व त्यांच्या सुखी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच सोशल डिस्टन्सिन्गचे भान राखून आणि कायद्याच्या चौकटीत राहून संपन्न झालेल्या या कार्यक्रमास फ / दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती वीणा सोनावणे यांनी साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच या प्रातिनिधिक स्वरूपातील कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक, माननीय श्री सचिन पडवळ, श्री. अनिल कोकीळ, श्री. दत्ता पोंगडे, यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले . हा संपूर्ण कार्यक्रम एज्युको संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मीनल श्रीनिवासन, कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.( धन्यवाद,साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल,परेल,८८७९८१०२९८)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here