यशस्वी पाठपुरावा

0

मुंबई : ( जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईनवेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप -९७६८४२५७५७)ईचलकरंजी: असंघटीत क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचेकडून मागील २० वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. यशस्वी पाठपुरावा व कामगारांना न्याय दिल्याबद्दल कामगारांमध्ये जाहीर अभिनंदन व अानंद व्यकत हाेत आहे.भविष्यात कामगारांना चांगले दिवस यंत्रमाग उद्योगातील कामगारांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाकडे शिफारशी केल्या आहेत. या शिफारसींची अंमलबजावणी झाल्यास कामगारांना निश्चितच भविष्यकाळात चांगले दिवस येतील असा आशावाद आमदार प्रकाशआण्णा आवाडे यानी व्यकत केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here