हॉलमार्किंग नियमातील HUID(Hallmarking unique identification number)जाचक नियमाला विरोध.

0

मनमाड : सोने विक्री करताना 16 जून 2021 पासून हॉलमार्किंग संबधी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.एचयुआयडी सारख्या अत्यंत किष्ट, किचकट प्रणालीला विरोध करण्यासाठी येत्या २३ ॲागस्ट रोजी राज्य व केंद्रीय सराफ संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणीक बंदला मनमाड सराफ,सुवर्णकार असोसिएशनने पाठिंबा दिला आहे.याबाबत निर्णय घेण्यासाठी आज दि. २२ ॲागस्ट रोजी सायंकाळी ७:३० वा. मनमाड येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नासिक शहरासह जिल्ह्यातील असोसिएशनशी चर्चा करून २३ ॲागस्ट रोजी नासिक शहरासह जिल्ह्यातील सर्व असोसिएशन एचयुआयडीला विरोध करण्यासाठी कडकडीत बंद पाळणार असल्याच्या निर्णयावर एकमत झाले असल्याने २३ ॲागस्टला दिवसभर नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व सराफी व्यवसाय एकदिवसीय बंद पाळणार आहेत. क्वालीटी कन्ट्रोलसाठी हॅालमार्क कायदा गरजेचा असून या कायद्याचे सर्व सराफ व्यावसायीकांनी स्वागत केले आहे. मात्र केंद्र सरकार एचयुआयडी सारखी क्लिष्ट प्रणाली आणुन सराफी व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आणू पहात आहे. या कायद्याने व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. हा कायदा रद्द करण्याची एकमुखी मागणी देशभरातून केली जात असून त्या पार्श्वभुमीवर २३ ॲागस्टला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सराफ व मनमाड सराफ,सुवर्णकार व्यावसायीक बंद पाळणार आहेत.मनमाड सराफ,सुवर्णकार असोसिएशन ने दिलेले निवेदन वरिष्ठ पातळीवर पोहचवावे ही नम्र विनंती.
( आपला विश्वासू: अध्यक्ष, सराफ,सुवर्णकार असोसिएशन मनमाड.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here