केळगाव प्रकल्प100% ओव्हरफ्लो

0

( सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील केळना नदीवर असलेल्या धरणात 100%जलसाठा जमा झाला परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासुन जोरदार पाऊस सुरु असल्याने केळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे सध्या केळगाव धरणावरुन अंभई,जांभई,पिंपळगाव घाट,रेलगाव या गावाला पाणी पुरवठा केला जातो याच्यासह 35 ते 40 गावांचा पाणी प्रशन मिटला आहे सध्या धरण ओसाडुन वाहत असल्याने ग्रामस्थ व शेतकर्‍यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना सुध्दा धरण परिसरात मध्ये चांगला पाऊस झाला होता केळगाव प्रकल्प पुर्ण भरला असून सध्या प्रकल्पाच्या सांड्यावरुन पाणी वाहत आहे,सतत तीन ते चार दिवसापासुन जोरदार पाऊस सुरु होता.आज गुरुवारी सांडव्यावरुन सात वाजता पाणी वाहत आहे.तीन ते चार दिवपासून जोरदार पावसाने केळगाव धरण 100%भरले आहे त्यामुळे धरणांत सुध्दा 100 %जलसाठा उपलब्ध झाला होता सिल्लोड तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती संपूर्ण तालुक्यात केवळ याच धरणात मुबलक पाणी साठा होता,या धरणातून जवळपास,सिल्लोड तालुक्यातील-कोल्हाळा तांडा,सिरसाळा तांडा,जंजाळा,पांगरी, सासुरवाडा, हट्टी, वडाळा, बोजगाव, रेलगाव वाडी, मोढा खुर्द, मोढा बुद्रुक, गोळेगाव खुर्द, गोळेगाव बुद्रुक, गव्हाली,जीवरग टाकळी, तांडा बाजार, रहेमाबाद, असडी, पिंपळगांव पेठ, मोहळ, बोरगाव सारवनी, वरुड पिप्रि, डोंगरगाव, सावखेडा खुर्द, बनकीनिळा, देऊळगाव बाजार, वांगी खुर्द,हळदा,टकला,मादनी,सारोळा, धोतरा,वडोद चाथा, म्हसला,खंडाळा, गेवराई सेमी,पिरोळा,चिंचवन, धावडा, तळवाडा, पळशी, डिंगर्स, पालोद,सोनापावाडी,पांनवदोड,अंभई, अजिंठा, शिवना जवळ पास 35 ते40 गावांची या धरणातून तहान भागवली या धरणावर दोन जलशुद्धीकरण केंद्र असून यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत अंभई येथे व जांभई येथे जलशुद्धीकरण केन्द्र आहेत या दोन ठिकाणाहून शुद्ध पाण्याचा पुरवठा तालुक्यातील गावांना केला जात होता
मात्र या वर्षी सुध्दा मागील तीन ते चार दिवसापासून धरण परिसरात पावसाने चांगली कृपा दाखवल्या मुळे धरणाचा साठा गुरुवारी सध्यांकाळी सात वाजता धरण 100 %भरले आहे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पाणी टंचाई गावांना दिलासा मिळाला आहे मात्र आता धरण परिसरात अवैध पाणी उपसा होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे केळगाव प्रकल्प पुर्ण भरला असून सध्या प्रकल्पाच्या सांड्यावरुन पाणी वाहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here