बारामती-समाजाकडुन समाजासाठी,विधायक उपक्रम आणि एकसंघ समाज या उद्देशाने विणकर दिनाचे औचित्य साधून, समाज कार्यासाठी प्रेरीत होऊन युवा व अनुभवी जेष्ठ बांधव यांनी समाजाच्या उन्नतीसाठी नुकतीच “कोष्टी व्हिजन ट्रस्ट”ची स्थापना केली. प्रत्यक्ष कार्य आणि संवाद व्हावा हाच प्रामुख्याने हेतु घेऊन ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी, हे अभिमान कोष्टी व्हिजन ट्रस्टने सुरु केले आहे. एक वर्ष (६ऑगस्ट २०२२पर्यत)केव्हीटी ने जनगणना हाती घेतलेली आहे. त्याच अनुषंगाने समस्त कोष्टी समाज बांधवांना एकसंघ करण्यासाठी बारामती येथे “कोष्टी व्हिजन ट्रस्ट”ची स्थापना करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष सचिन बाईत, उपाध्यक्ष नितीन दिवटे,सचिव अॅड.सचिन टकले (देवांग),सह सचिव दिपक रेपाळ, खजिनदार अॅड.संदेश गुंडगे,कार्याध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व विश्वस्त गणेश वरुडे अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.चंद्रकांत बाईत,भास्करराव गुंडगे, गजानन लोकरे,प्रविण दिवटे आदी मार्गदर्शक आहेत. कोष्टी व्हिजन ट्रस्टचे समाजाकडुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,अभिनंदन व कौतुक होत आहे.