आवक वाढल्याने मिरचीचे भाव गडगडले,

0

सिल्लोड प्रतिनिधी/ विनोद हिंगमिरे : सिल्लोड तालुक्यातील भराडी पिरोळा फाटा येथे मिरचीचे भाव घसरले,असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. तालुक्यातील भराडी पिरोळा फाटा येथील गेल्या पंधरा दिवसापूर्वी 3000 ते 3100 रुपये भावाने मिरची खरेदी केली जात होती.परंतु सध्या मिरचीचे भाव दीड हजार रुपयाने घसरल्याने शेतकऱ्यांना आपला माल पंधराशे ते अठराशे रुपये भावाने मातीमोल विक्री करावा लागत आहे.भराडी परिसरात हजारो हेक्टर वरती शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी मिरचीची लागवड केली आहे.मात्र अचानकच दीड हजार रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले आहे.मिरची लागवडी पासून ते आतापर्यंत भरपूर असा खर्च व विविध रोगांचा सामना करावा लागतो. परंतु अचानकच मिरची पिकाची आवक वाढल्याने व भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्च मजुरांचे पैसे निघत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट आले आहे. पूर्वहंगामी लावलेल्या मिरचीला सुरुवातीला काही शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी असल्याने लागवड केली. त्यात काही शेतकऱ्यांकडे पाणी नसल्याने टँकरद्वारे विकत पाणी घेऊन मिरची पिकाला पाऊस पडेपर्यंत कसेबसे जगवले, त्यामध्ये आठ दिवसापूर्वी पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी मारल्याने त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली रात्रीची लाईट द्वारे मिरची पिकाला पाणी द्यावे लागले.परंतु इतर राज्यात मिरची पिकाची आवक वाढल्याने राज्यातील व्यापारी सुद्धा मिरची कमी भावाने खरेदी करत आहे. त्याचाच परिणाम भराडी पिरोळा फाटा मिरची मार्केटमध्ये जाणवू लागला आहे यावर्षी हजारो हेक्टर वरती शेतकऱ्यांनी यावर्षी मिरची पिकाची लागवड केली असल्यामुळे येथील मिरची मार्केटमध्ये आवक वाढली आहे. भराडी/पिरोळा फाटा या परिसरातील मोठे मिरची मार्केट असल्याने दूरवरून याठिकाणी मिरची विक्री करण्यासाठी शेतकरी येत असतात.असाच भाव जर कायम राहिला तर झालेला खर्च सुद्धा निघणार नाही. अशी प्रतिक्रिया भराडी परिसरातील शेतकऱ्यांनी दैनिक आनंद नगरीशी बोलताना दिली आहे.( शेतकरी एप्रिल महिन्या मध्ये 10,000 रोपांची लागवड केलेली आहेत. आत्तापर्यंत रासायनिक खते कीटकनाशक औषधे असा भरपूर खर्च मिरची पिकावरती केलेला आहे.आतापर्यंत 3000 ते 3100 रुपये भावाने विक्री केली.परंतु झालेला खर्चही निघत नाही, तोच मिरचीची आवक वाढल्याने 1500 रुपयांनी भाव कमी झाल्याने माझे भरपूर असे नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. मजुरांचा खर्चही निघत नसल्याने इतर खर्च कसा निघेल असा प्रश्न मला पडला आहे. यावर्षी वेळोवेळी औषध फवारणी करून सुद्धा विविध रोगांचा सामना करत कसेबसे मिरची पिकाला जगवले आहे. नुकताच माल निघायला सुरुवात झाली,त्यावर भावात मोठी घसरण झाल्याने माल मातिमोल भावात नाईलाजाने विकावा लागत आहे. व पुढे जर असाच भाव राहिला तर यावर्षी मिरची पीक हे धोक्यात ठरवले जाईल.- बाबुराव उत्तम डापके-
(प्रगतशील शेतकरी वडाळा) बाहेर राज्यात पाऊस चालू असल्यामुळे त्यातच काही सार्वजनिक सुट्ट्या येत आहे. व मिरचीची आवक वाढल्याने बाहेर राज्यातील व्यापारी हे कमी भावाने मिरची खरेदी करत असल्यामुळे आम्हालासुध्दा नाईलाजाने कमी दराने मिरची खरेदी करावी लागत लागत आहे. – दत्तू भाऊ सोनवणे-
(मिरची व्यापारी भराडी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here