खराब रस्त्यामुळे वेळेत दवाखान्यात न पोहचल्याने गेला चिमुकल्याचा बळी,

0

सिल्लोड प्रतिनिधी- विनोद हिंगमिरे,सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील कुणाल कृष्णा काळे ह्या 5 वर्षीय बालकाला सर्पदंश झाला.ही बाब लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता कुणाल ला उचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना खुपटा ते जळकी बाजार फाटा या खराब रस्त्यामुळे दवाखान्यात जाण्यास उशीर झाल्याने रस्त्यातच कुणाला चा मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना मंगळवार रोजी दुपारी 12 च्या सुमारास घडली.सविस्तर वृत्त असे की सध्या शाळा बंद असल्यामुळे आपल्या आईवडिलांसोबत कुणाल शेतात गेला असता तिथे खेळत असताना कुणाला सापाने दंश केला कुणाला रडताना बघून त्याच्या आईने तात्काळ धावघेतली मात्र आईच्या डोळ्यासमोरच सापाने पुन्हा एकदा कुणाला दंश केला.शेतात काम करीत असलेले गजानन काळे यांनी तात्काळ कुणालला आपल्या खांद्यावरून आपल्या वाहनात बसविले व क्षणाचा ही विलंब न करता उपचार साठी ते अजिंठा येथील शासकीय रुग्णालयाच्या दिशेने निघाले,मात्र खुपटा ते जळकीबाजार या 5 किलोमीटर रस्त्याच्या बिकट दुरावस्थेमुळे त्यांना दवाखान्यात पोहचण्यास उशीर झाला आणि रस्त्यातच कुणालची प्राणज्योत मावळली अश्या प्रकारे खराब रस्त्याचा पुन्हा एक बळी या परिसरात गेला आहे.या आधी ही खराब रस्त्यामुळे एक गरोदर मातेला रस्त्यातच प्रसूतीची वेळ आल्याने आपल्या बाळास मुकावे लागले आहे.या घटनेनंतर बांधकाम उभागाचे संबंधित अधिकारी भोसले साहेब यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देत पुन्हा एकदा वेळकाढूपणा केला आहे.या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जळकीबाजार खुपटा येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.कारण या रस्त्यावर कधी कुणाचा अपघात होऊन कपाळमोक्ष होईल काहीच सांगता येत नाही.अनेक वेळा वृत्तपत्रातून बातम्या प्रसारित करून निवेदने देऊनही अधिकारी रस्त्याच्या दुरावस्थेवर बोलायला तयार नाहीत,लोकप्रतिनिधी कधी इकडे फिरकत ही नाही ,अश्या अवस्थेत नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे.
या घटनेनंतर मात्र नागरिकांनामधून संताप व्यक्त होत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here