युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत च्या मुंबई पदाधिकारी यांच्या वतीने महापौर किशोरी ताई पेडणेकर यांचा सत्कार सोहळा संपन्न

0

मुंबई : युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत च्या मुंबई मधील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने महापौर चा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
करोना सारख्या महामारी मुळे मुंबईला खीळ बसली. सगळ्या जगाचे लक्ष महा मुंबईकडे असताना आजारी मुंबईची ज्या धीराने त्यांनी सेवा केली. संपूर्ण जगाला आदर्श असे मुंबई मॉडेल दिले. व जसे एका रुग्णाला परिचारिका पूर्ण उपायाने, मायने बरी करते तसे पूर्ण मुंबईला आपण ठणठणीत बरे केले, आणि अश्या कर्तबगारीने लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन ने सन्मानित करण्यात आले,त्याबद्दल मुंबईच्या आदर्श प्रथम नागरिक ( महापौर) म्हणून सौ. किशोरी ताई पेडणेकर यांचा UHRC मुंबई टीम कडून जाहीर सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी UHRC च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णाताई कदम, कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश श्री.जितेंद्र दगडू सकपाळ, आशेरमुख फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा आणि UHRC च्या मा.ठाणा पालघर जिल्हा अध्यक्षा सौ.अनिता घोष,किशोर घोष,रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.मंगेशजी डफळे,मुंबई जिल्हा अध्यक्ष,श्री.अमोलजी वंजारे,मुंबई उपसचिव श्री.संदिपजी मोहिते,दादर ब्लॉक अध्यक्ष श्री.सचिनजी जॉइजोडे,चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्षा सौ.वसुधाजी वाळुंज,अध्यक्ष श्री.सुहासजी परब,सदस्य संजीव परमार,विवेक माने,अंजली भोसले,मंगेश सावंत,वासुदेव सुतार,नीरजा सकपाळ,श्रावणी वाळुंज व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.धन्यवाद,महेश्वर तेटांबे,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here